Bride Groom Viral Video: लग्नाशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सहसा हे व्हिडिओ मजेदार असतात. कधी नवरी नाचताना दिसते तर कधी नदुल्हा डान्स करते देखती है, कधी मेव्हण्या नवरदेवाची मस्करी करतात, तर कधी नवरी नाचताना दिसते. कधी सासरी निघालेली मुलगी रडते तर कधी तिचे आई वडील, भाऊ रडताना दिसतात. दरम्यान आता एक हटके व्हिडिओ चर्चेत आला आहे.
गृहप्रवेश करताना नवरीने काय केले?
सध्या सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ नवरी नवरदेवाच्या घरात प्रवेश करत आहे. नवरी जेव्हा लग्नांतर पहिल्यांदा गृह प्रवेश करते तेव्हा धान्याने भरलेले मापटे किंवा कलश पायाने ढकलावा लागतो त्यानंतर ती घरात पाऊल टाकते. पण व्हायरल व्हिडीओमध्ये वेगळेच काहीतरी घडते. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असे दाखवले आहे की, वधू तिच्या पतीच्या घरात धान्याने भरलेला कलश पाडून प्रवेश करते पण पायाने नव्हे तर हाताने पाडते.
व्हिडिओमध्ये असे दिसून येते की गृहप्रवेश करताना अचानक नवरी खाली बसते आणि नंतर हात जोडून अन्नदेवतेला नमस्कार करते. यानंतर ती तिच्या हातांनी धान्याने भरलेला कलश पाडते. नंतर ती उभी राहते आणि घरात प्रवेश करते. आधी नवरी काय करते कोणालाच समजत नाही पण शेवटी जेव्हा ती पायाने कलश न पाडता हाताने पाडते तेव्हा सर्वजण थक्क होऊन पाहत राहतात. तिची छोटीशी कृती सर्वांचे मन जिंकते. नवरदेव देखील खुश असल्याचे दिसते.
व्हायरल व्हिडिओ येथे पहा –
मुकेशदेव१२१ नावाच्या वापरकर्त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये वापरकर्त्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ते नवरीच्या कृतीचे कौतुक करताना दिसत आहेत. त्याच वेळी, तिचा नवरा आणि सासू भाग्यवान असल्याचे सांगितले जात आहे.
व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले, “वाह, किती छान. अन्न देवतेचा सन्मान करत राही.” दुसऱ्या युजरने लिहिले, “कमाल केलीस ताई कलशला पाय नाही लावला कारण त्यात तांदुळ होते.” तिसऱ्या युजरने लिहिले, “आपले वडीलधारे अज्ञानी आहेत का ज्यांनी ही प्रथा चुकीची आहे हे असे का म्हटले नाही?” त्याच वेळी, दुसऱ्या युजरने म्हटले, “हे करायला हवे, हे तांदळाचे भांडे हाताने पाडायला हवे.”