Santa Claus In Mumbai Local Video : देशभरात सध्या ख्रिसमस सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. त्यासंबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. ख्रिसमसनिमित्ताने मुंबईसह अनेक शहरांत चर्च आणि रस्त्यांवर आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ख्रिसमसच्या दिवशी लहान मुलांना उत्सुकता असते ती म्हणजे सांताक्लॉजची. अशात आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे, ज्यात सांताक्लॉजच्या गणवेशात एक व्यक्ती चक्क मुंबई लोकलने प्रवास करताना दिसतेय. यावेळी ट्रेनच्या दरवाजावर उभं राहून तो लोकांकडे बघून असे काही करतोय की पाहून तुम्हालाही हसू येईल. हा मजेशीर व्हिडीओ सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सांताक्लॉजचा मुंबई लोकलच्या गर्दीतून प्रवास

येशू ख्रिस्तांच्या जन्मदिनी, अर्थात ख्रिसमसनिमित्ताने काही लोक सांताचा गणेवश परिधान करत लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे लहानग्यांसह मोठ्यांनाही ख्रिसमसचा एक वेळा उत्साह अनुभवता येतो. कारण सांताक्लॉजच्या गणवेशातील व्यक्ती लोकांना भेटवस्तू देत हसताना किंवा डान्स करताना दिसतो, पण व्हायरल व्हिडीओत सांताक्लॉज चक्क मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसतोय. होय, तुम्हाला हे मजेशीर वाटेल पण व्हिडीओत सर्वांचा लाडका सांता चक्क मुंबई लोकल ट्रेनमधील गर्दीत दरवाजावर उभा राहून प्रवास करताना दिसतोय.

Video of uncle standing in fountains on FC Road goes viral
पुणेकर उन्हाळ्यासाठी सज्ज! कारंज्यांवर उभ्या असलेल्या काकांचा Video Viral, नक्की काय आहे प्रकरण?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
Mahakavi Kalidas Natya Mandir Theatre reserved for parking lot
वाहनतळासाठी नाट्यगृह आरक्षित; महाकवी कालिदास नाट्यमंदिरातील प्रकार
udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
indian railways shocking video
ट्रेनमधून आरामात झोपून प्रवास करताय? मग ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच, तुमच्याबरोबर घडू शकते अशी घटना
mumbai local train video Mumbaikars Struggle
“काही झालं तरी हात सुटला नाही पाहिजे” जो इथे जिंकला तोच आयुष्यात टिकला; मुंबई लोकलच्या रोजच्या जीवघेण्या प्रवासाचा VIRAL VIDEO
Shocking video Mumbai Local Women Fought With Each Other At Dombivli Railway Station
“महिलांना आता पुरूषांची नाही महिलांचीच भिती” डोंबिवली रेल्वे स्टेशनवरील खतरनाक VIDEO होतोय व्हायरल

फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्नीसह स्वीकारला इस्लाम धर्म? नमाज अदा करताना PHOTO व्हायरल; पण सत्य काय, वाचा….

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, प्रवाशांनी गच्च भरलेल्या ट्रेनच्या दरवाजावर उभं राहून सांताक्लॉजच्या गणवेशात एक व्यक्ती प्रवास करताना दिसतेय. यावेळी चालत्या ट्रेनमधूनच ती समोरच्या प्लॅटफॉर्मवर उभं राहून प्रवाशांकडे बोट दाखवत असे काही हावभाव करतेय की, पाहणाऱ्यालाही हसू येईल. यावेळी प्लॅटफॉर्मवरील प्रवासीदेखील लोकलच्या गर्दीत प्रवास करणाऱ्या सांताला पाहून हसू लागतात. मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम हा सांताक्लॉज ख्रिसमसनिमित्त करत होता. हा व्हिडीओ चर्चगेट-विरार लोकलमधील असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अनेकांनी कमेंट्समध्ये सांताक्लॉज बनलेल्या व्यक्तीचे नावही सांगितले आहे. रवी नायर असे या सांता बनलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Santa Claus In Mumbai Local

unexplored_vasai नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेक जणांनी वेगवेगळ्या भन्नाट, मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, सांताक्लॉज निघाला चर्चगेटला, दुसऱ्या युजरने लिहिले की, हे फक्त मुंबईतच पाहायला मिळेल. तिसऱ्याने लिहिले की, हा आपला लोकलवाला सांता आहे. चौथ्याने लिहिले की, सांता वे टू सांताक्रूझ…शेवटी एका युजरने लिहिले की, सांता जर सेकंड क्लासमधून गेला तर त्याची चांगलीच हजामत होईल.

Story img Loader