देशातल्या कानाकोप-यात तंत्रज्ञान पोहोचावे यासाठी पंतप्रधान मोदी फारच आग्रही आहेत. नोटाबंदीच्या निर्णानंतर एक पाऊल पुढे टाकत देशातल्या जनतेने कॅशलेस आणि डिजिटल व्यवहारांकडे वळावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. संथाली इथल्या आदिवासी महिलांना मोदींच्याहस्ते एका योजनेअंतर्गत स्मार्टफोनचे वितरण केले. यावेळी इथल्या दोन बहिणींनी मोदींना चक्क ‘भीम’सहित इतर अॅप कसे वापरावे यांचे धडे दिले. या महिलांचे स्मार्ट फोनबद्दल एवढे ज्ञान पाहून मोदींही थक्क झाले. या दोघींचेही त्यांनी कौतुक केले आहे.

झारखंड सरकारची सखी मंडळाच्या आदिवासी महिला उद्योजिकांना एक लाख स्मार्ट फोनचे वितरण करण्याची  योजना आहे. यापैकी काही आदिवासी महिलांना मोदींच्या हस्ते स्मार्टफोनचे वितरण करण्यात आले. यावेळी दोन महिलांनी मोदींना ‘भीम’सहित इतर अॅप कसे वापरावे हे देखील दाखवले. स्मार्टफोन वापरणा-या या महिलांना पाहून मोदींनाही फार कौतुक वाटले. नोटांबदीचा निर्यण लागू केल्यानंतर आपण कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य दिलं, लोकांनी रोखीने व्यवहार करण्यापेक्षा जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहाराकडे वळावे असा माझा आग्रह होता. पण गरीब लोक स्मार्टफोन कसे वापरतील आणि त्यांच्या एकंदर क्षमतेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. पण आता मात्र या महिलांकडे पाहून त्यांच्याकडेही तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता आहे हे मी छातीठोक पण सांगू शकतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Story img Loader