आयपीएल २०२३ चा ७० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगला. या सामन्याकडे जेवढे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्सच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते, त्याच्यापेक्षा अधिक पटीने मुंबई इंडियन्सच्या चाहत्याचे लक्ष या सामन्याकडे लागले हाते. हो कारण या सामन्यात जर आरसीबीचा पराभव झाला तरच मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळणार होता.
कालचा सामना खूप अटीतटीचा झाला आरसीबीच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई करत २० षटकात १९७ धावा केल्या. शिवाय विराट कोहलीने धडाकेबाज फलंदाजी करत शतक ठोकलं. पण या सामन्यात गुजरात टायटन्सच्या शंकर आणि शुबमन गिलच्या जबरदस्त खेळीने गुजरातला या सामन्यात सहज विजय मिळवून दिला. या सामन्यात शुबमन गिलने, त्याने ५२ चेंडूत ८ षटकार आणि ५ चौकारांच्या जोरावर १०४ धावांची नाबाद शतकी खेळी केली. गुजरातने आरसीबीचा पराभव केला. त्यामुळे आरसीबी प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आणि मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.
मात्र, या सगळ्यामध्ये आता नेटकऱ्यांनी मात्र सोशल मीडियावर मिम्ससा अक्षरश: पाऊस पाडला आहे. शुबमन गिलने शतक केलं पण सोशल मीडियावर चर्चा मात्र सारा सारा तेंडुलकरच्या नावाची सुरु आहे. कारण मागील अनेक दिवसांपासून शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. अशातच आता काल जबरदस्त खेळी केलेल्या शुबमन गिलने मुंबईला प्ले ऑफमध्ये प्रवेश करुन देण्यासाठीच तुफानी फलंदाजी केल्याची चर्चा नेटकऱ्यांनी सुरु आहेत. शिवाय त्याच्या या खेळीमुळे सचिन आणि मुंबईकर खूप आनंदी आहेत. त्यामुळे आम्हाला हा जावई पसंद असल्याच्या पोस्ट मुंबईचे चाहते करत आहेत. तर काहींनी आता सचिनने देखील दोघांच्या लग्नाला परवानगी दिली असेल असं म्हटलं आहे. चला तर नेटकऱ्यांनी केलेली मजेशीर मिम्स पाहूया.
wtf_normie नावाच्या इंस्टाग्राम पेजवर सारा आणि शुभमनचा फोटो पोस्ट केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये, “आता तेंडुलकर कुटुंबीयांची नातं फिक्स” असं लिहिण्यात आलं आहे.
तर sagarcasm नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये सचिन शुभमनला तु माझा मुलगा आहेस, असं म्हणत असल्याचं दाखवलं आहे.
एका नेटकऱ्याने आरसीबीच्या फलंदाजीचं कौतक आणि बॉलिंगची मात्र मस्करी केली आहे.