Sara Tendulkar Reaction on Shubman Gill Wicket: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताने श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव केला. भारताने सलग सातवा सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ८ बाद ३५७ धावा केल्या होत्या. यामध्ये सलामीवीर शुबमन गिल (९२), विराट कोहली (८८) आणि श्रेयस अय्यर (८२) धावा काढून बाद झाले. पण या दरम्यान शुभमन गिलच्या विकेटवर सारा तेंडुलकरनं दिलेला रिअॅक्शन सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विश्वचषक २०२३ चा ३३वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी सारा तेंडुलकरनेही हजेरी लावली होती. ३०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शुबमन गिल ९२ धावांवर बाद झाला. त्याला दिलशान मधुशंकाने बाद केले. त्याने ९२ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकार मारले अन् ९२ धावांची अप्रतिम खेळी खेळली, पण त्याचे शतक हुकले. गिलला शतक झळकावण्यात अपयश आलं.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

(हे ही वाचा : अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानला मिळालेल्या आर्थिक मदतीच्या चर्चेवर रतन टाटांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “माझा क्रिकेटशी…”  )

वर्ल्डकपमधील शुबमन गिलचं शतक हुकल्याने तमाम भारतीय चाहत्यांची मोठी निराशा झाली. याशिवाय सारा तेंडुलकरही उदास दिसत होती. साराचा चेहरा पडलेला दिसून येत होता. पण क्षणातच सारा उभे राहून गिलच्या खेळीचे कौतुकही करताना दिसून आली. साराची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तथापि, ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित असलेल्या सदस्यांनी गिलला त्याच्या या शानदार खेळीसाठी उभे राहून दाद दिली, ज्यामध्ये सारा तेंडुलकरचाही समावेश होता.

येथे पाहा व्हिडिओ

भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात केवळ शुभमन गिलचेच शतक हुकले नाही, तर त्याच्याशिवाय विराट कोहली (८८) आणि श्रेयस अय्यर (८२) यांनाही आपली शतके पूर्ण करता आली नाहीत. मात्र, यांच्या शानदार खेळीमुळे भारतानं ५० षटकांत ८ बाद ३५७ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाचा ५५ धावांत भारताने धुव्वा उडवला. 

Story img Loader