जगभरात असे कित्येक लोक आहेत जे आपल्या टॅलेंटच्या जोरावर असे काही करतात की पाहणाऱ्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तसेच काही लोक असेही असतात की जे विचित्र प्रयोग करतात आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का देत असतात. अनेकदा व्हायरल व्हिडीओ करण्याच्या नादात काही लोक स्वत: च जीव धोक्यात टाकत कसरती करताना दिसतात. सोशल मीडियावर असेल अनेक व्हिडीओ दर दिवशी व्हायरल होत असतात. दरम्यान सध्या अशाच एका सरदारदजीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ज्या सरदार जी रस्त्यावर बुलेट चालवताना दिसत आहे पण त्याची बुलेट चालवण्याची पद्धत पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काही लोकाना व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही, काही लोकांना सरदारजीच्या कौशल्याचे कौतुक करत आहे. तर काही लोक धोकादायक पद्धतीने बुलेट चालवल्याबद्दल टिका करत आहे.
बिनधास्तपणे हात सोडून बुलेट चालवतोय सरदारजी!
सध्या पंजाबच्या रस्त्यांवर बाईक राईड करणाऱ्या व्यक्तीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही क्षणभर थक्क व्हाल. व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक मजा करत आहेत आणि म्हणत आहेत की, “भारतातील लोक कोणत्याही कारला टेस्लामध्ये बदलू रुपांतरीत शकतात”. हा व्हिडिओ पटियाला ते सामना रस्त्यावरील असल्याचे सांगितले आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सरदारजी त्यांच्या बुलेटवर राईडचा आनंद लुटताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, “सरदार जी एका बाजूने पाय सोडून. एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून, हात सोडून आरामात बुलेट चालवत आहेत.
हेही वाचा – बजरंगबलीच्या दर्शनासाठी उंच टॉवरवर चढला भक्त! हनुमंताच्या चरणाशी बसलेल्या माकडाचा Video Viral
या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया अशाच आहेत
हा व्हिडिओ 1000thingsinludhiana या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यावर समजू शकते की, “मागून येणाऱ्या एका कार चालकाने मनोरंजनासाठी हा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ” २ दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला १ लाख २७ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत आणि व्हिडिओवर मजेदार कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘लोक अनावश्यकपणे टेस्ला टेस्ला ओरडतात. भारतातील लोक इतके प्रतिभावान आहेत की ते टेस्लासारखी बुलेटही चालवू शकतात.” आणखी एका यूजरने लिहिले की, ‘असे दृश्य फक्त भारतातच पाहायला मिळते.’ तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘आता पंजाब पोलीस या व्यक्तीला शोधत आहेत.’