२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, घरगुती हिंसाचाराला सामोरे जाणाऱ्या सुमारे ८६ टक्के महिलांनी कधीही मदतीची मागणी केली नाही. त्या ८६ टक्के महिलांपैकी सुमारे ७७ टक्के पीडितांनी या घटनेबद्दल कोणालाही सांगितले नाही. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात घरगुती हिंसाचाराच्या संख्येत झालेली वाढ पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. सोशल मीडियाच्या युगात काहीही लपून राहत नाही. सोशल मीडियावरील काही व्हिडीओ पाहून कुणाच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं तर कुणाला हशा, राग किंवा कधीकधी आपल्याला भावूक बनवतात. सध्या पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या मनीषा गुलाटी यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मनीषा गुलाटी त्यांच्या कार्यालयात एका महिलेशी बोलताना दिसत आहेत. यात त्यांनी समोर असलेल्या महिलेला विचारलं, “तुला कानाखाली मारली गेली…तू इतकी कमकुवत आहेस का…? तू उच्च शिक्षण घेतलेलं आहेस आणि कनाशिलात मारल्यानंतर ते सहन केलंस?” असं बोलल्यानंतर मनिषा गुलाटी यांनी त्या महिलेचा हात धरला आणि म्हणाल्या, “सारं शिक्षण तू झिरो केलंस…” हे ऐकून समोरच्या पिडीत महिलेला रडू कोसळतं.

समोरच्या महिलेला रडताना पाहून पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसलेल्या मनिषा गुलाटी भावूक होतात आणि तिला मायेने जवळ घेऊन तिला आधार देत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. या व्हिडीओ पाहून नेटिझन्स मनिषा गुलाटी यांनी ज्या प्रकारे त्या पिडीत महिलेला धीर दिला, त्याचं कौतुक करताना दिसून येत आहेत.

मनिषा गुलाटी यांनी स्वतः त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी मुली आणि महिलांना एक आवाहन करण्यासाठी एक स्पेशल कॅप्शन देखील दिलीय. “मुलींनो… कोणाचीही हिंसा सहन करू नका..उठा..लढा..” असं त्यांनी या कॅप्शनमध्ये लिहिलंय. या व्हिडीओला आतापर्यंत ६.२ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५ लाख ७० हजार लोकांनी या व्हिडीओल लाईक केलेलं आहेत.

एका युजरने म्हटलं, “स्त्रीच्या कल्याणासाठी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक वाटतंय ..” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय, “मनीषाजी आम्हाला सुशासन देण्यासाठी आणि पंजाबचे नेतृत्व करण्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे, देव तुम्हाला अधिक शक्ती आणि चांगले आरोग्य देवो.” अशा हजारो कमेंट्समधून नेटिझन्सनी या व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.

Story img Loader