Viral video: महिलांच्या छेडछाडीच्या घटना हल्ली वाढू लागल्या आहेत. त्यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे समाजातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.मध्यंतरी अशीच एक घटना घडली होती जेव्हा एका मुलीची छेडछाड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला परिसरातल्या लोकांनी बदम मारलं होतं. सध्या असाच काहीसा प्रकार राजस्थानमधून समोर आला आहे. राजस्थानमधील भीलवाडा येथे एका माजी सरपंचानं काही महिलांची भर बजारात छेड काढल्याचा प्रकार समोर आला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

राजस्थानमधील भीलवाडा येथील एका गावचा पूर्व सरपंच असलेला हा व्यक्ती बाजारात उभ्या असलेल्या ३ , ४ महिलांना घाणेरडे इशारे करत होता. महिलांना सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, मात्र याचाच फायदा घेत हा व्यक्ती तशीच छेड काढत राहिला. दरम्यान महिलांनी बघून बघून आणि ज्यावेळी राग अनावर झाला त्यावेळी त्या व्यक्तीला बेदम मारलं. त्याचे कपडे फाडले, त्याला पळवून पळवून मारलं. तीन ते चार महिलांनी या त्या व्यक्तीला सळ की पळो करुन सोडलं. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. ग्रामस्थ हे सगळं पाहत होते मात्र त्याला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही.

a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Image of the stampede incident
“आईच्या मृत्यूबाबत मुलीला माहित नाही”, ‘पुष्पा २’ च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितेच्या पतीची हृदयद्रावक गोष्ट

काही वेळाने स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आरोपीला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. अद्याप त्या व्यक्तीवर कोणताही दुन्हा दाखल केला नसून प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – “मुलींनो म्हणून बेस्ट फ्रेंडसोबत लग्न करु नका !” VIDEO पाहून कळेल याचं कारण

याआधीदेखील राजस्थानमध्ये एका तरुणीची छेडछाड काढणाऱ्या तरुणाला अशीच ऑन द स्पॉट शिक्षा देण्यात आली. त्या तरुणालादेखील  झाडाला बांधून बेदम मारहाण केली. तिथं असलेल्या सर्व महिलांनी त्याला झाडाला बांधून चपलेलनं मारलं. हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

शिवाय काही दिवसांपूर्वीच पत्नीने आपल्या वेबड्या पतीला घरात एका खांबला मारून काठीने चोपलं होतं. पत्नीशी खोटं बोलून तो दारू पिऊन आला आणि मग तिचा पारा असा चढला की तिनं नवऱ्याचे हातपाय बांधून त्याला एका खांबाला बांधलं आणि कपड्यासारखं त्याला धुवून काढलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र ही घटना कुठली होती ती माहिती नाही.

Story img Loader