Satara Kas Pathar video: कास परिसरात सध्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत असून दाट धुके, रिमझीम पाऊस व अंगाला झोंबणारा गार वारा असं मस्त वातावरण आहे. पावसामुळे डोंगररांगा हिरव्यागार आहेत. जागतिक वारसा स्थान व विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फुलं बहरण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन ते चार दिवसात कासवर खरी फुलांच्या रंगाची उधळण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता पर्यटकांचीही पावलं कास पठाराकडे वळत आहेत. या कास पठाराचा आणि आजूबाजूच्या परिसराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही लगेच कास पठारावर जायला प्लॅन कराल एवढं नक्की.

कास परिसरात सध्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत असून दाट धुके, रिमझिम पाऊस व अंगाला झोंबणारा गार वारा असं मस्त वातावरण आहे. वीकेंड व पंधरा ऑगस्टमुळे पर्यटकांची चांगलीच रेलचेल होती. जुन-ऑक्टोबर दरम्यान तृण, कंद, वेली, वृक्ष, झुडपे, आर्किड, डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक निळ्या, जांभळ्या, लाल रंगाची फुले येतात. मध्य ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये विविधरंगी दुर्मिळ फुलांचे गालिचे पर्यटकांना आकर्षित करतात.

raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
463rd Sanjeev Samadhi ceremony of Shri Morya Gosavi Maharaj concluded
पिंपरी : पुष्पवृष्टी, नगरप्रदक्षिणा, कीर्तन, महापूजा आणि महाप्रसादाने महोत्सवाची सांगता
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक
learn how to save money from a lady
सेव्हिंग करणे कोणी यांच्याकडून शिकावं! गल्ला फोडला अन्…पाहा Viral Video

हा व्हिडीओ trending_satara नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कास पठार परिसरातलं दृश्य आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहे. कास पठाराबरोबर आजूबाजूचा परिसरही हिरवागार झाला आहे. कास पठार आता फुलायला सुरुवात झाली असून अगदी काहीच दिवसांत तुम्हाला या पाठारावर फुलं पाहायला मिळतील.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> चिंचपोकळी ‘चिंतामणी’च्या आगमनाची तारीख ठरली; पण यंदाची वेळ माहितीये का? गणेशभक्तांनो जाण्याआधी जाणून घ्या

कास पठारावर जाण्याआधी बुकींग कसे कराल ?

कास पठारावर साधारण दिवसभरात तीन हजार पर्यटक भेट देतel. येथे भेट देण्यासाठी पर्यटकांना http://www.Kas.ind.in या वेबसाईटवर बुकिंग करणे गरजेचे आहे.जास्तीत जास्त ऑनलाईन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच कास पठारावर प्रवेश दिला जाणार असून, पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करूनच जावे.

किती क्षेत्रात पसरले आहे कास पठार ?

साताऱ्यापासून २५ किमी, महाबळेश्वरपासून ३७ किमी आणि पाचगणीपासून ५० किमी अंतरावर कास पठार हे अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. इथे फुलांच्या आठशेहून अधिक प्रजाती आढळतात. हे पठार तब्बल एक हजार हेक्टर क्षेत्रात पसरले आहे.

फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ

कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज कमिटीने जुलै २०१२ मध्ये मान्य केलेल्या पश्चिम घाटातील ३९ ठिकाणांपैकी एक आहे. २१ देशांच्या सभासदांसमोर पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळाचे नामांकन मिळाले. त्यातील कास हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ आहे.

Story img Loader