Udayanraje Bhosale Lok Sabha Election 2024: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेली लोकसभा निवडणूक २०२४च्या सातही टप्प्यातील मतदान पार पडले असून आज लोकसभा निवडणुकीचा निकाला जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर आता पुन्हा एकदा साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनी निवडणूकीसाठी उभे राहिले आहेत. यंदाच्या सातारा लोकसभा मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळत काही. मतमोजणीला सुरूवात झाल्यापासून दोन्ही उमेदवार कधी आघाडीवर तर कधी पिछाडीवर दिसत होते. मात्र, १४ व्या फेरीत उदयनराजेंनी मुसंडी घेत शशिकांत शिंदेंना मागे टाकलं. उदयनराजे १४ व्या फेरीत ४००० मतांनी आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जलमंदिर पॅलेसवर जाऊन मोठा जल्लोष केला. कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहून, उदयनराजे भावूक झाल्याच दिसलं. उदयनराजेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं जलमंदिर पॅलेसमध्ये?
उदयनराजेंनी मतांची आघाडी घेताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. सातारा शहर व परिसरात फटाके फाेडले. अनेकांनी गुलाल उधाळला. दरम्यान जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे भाेसले यांचे कार्यकर्त्यांनी अभिनंदन करत गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केलेला पाहायला मिळाला.
साताऱ्यात पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग!
सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. सकाळपासून लीडवर असलेले शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे सकाळपासून बहुतांश फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते. परंतु, वेळ फिरली आणि अचानक उदयनराजेंनी शिंदेंचे लीड तोडत आघाडी घेतली. हे कळताच उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. त्यांच्या पत्नीनेही त्यांना मीठी मारली. पंधराव्या फेरीअखेर उदयनराजेंनी ९७३६ मतांची आघाडी घेतली आहे. उदयनराजेंना ४,७९,३०४ तर शशिकांत शिंदेंना ४,६९,५६८ मते मिळाली आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> PHOTO: “निवडणूक जिंकायची म्हणजे पाण्यासारखा पैसा..” लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर मीम्सचा महापूर
पाचव्या फेरीअखेर उदयनराजे यांना १ लाख २८ हजार ३७५ तर शशिकांत शिंदे यांना १ लाख ४१ हजार ८२ मते मिळाली. दुसऱ्या फेरीनंतर शशिकांत शिंदे यांनी घेतलेली आघाडी नवव्या फेरीपर्यंत कायम राहिली. नऊ फेऱ्यांचा निकाल हाती आला तेव्हा शशिकांत शिंदे यांनी १९ हजार ७१ मतांनी आघाडी घेतली होती. या आघाडीमुळे शिंदे समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला होता. मात्र पुन्हा डाव उलटला अन् सातारा, वाई आणि कराड उत्तर मतदारसंघाच्या मोजणीत उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंचे लीड तोडून मताधिक्य घेतले.