Satara Paragliding to College video: विचार करा तुमची पुढच्या १५ मिनिटांत परीक्षा आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी आहे तिथून परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. अशावेळी तुमची काय अवस्था होईल? किंवा तुम्ही काय कराल?..तुम्ही म्हणाल काय होणार आहे, पेपर बुडणारच…साताऱ्यात मात्र एका विद्यार्थ्यानं नादच केला. परिक्षेला आधीच उशीर झाला होता त्यात १५ मिनिटांत पेपर होता आणि घाटात वाहतूक ठप्प झालं होतं अशावेळी या मुलानं असं डोकं लावलं की अगदी काही वेळातच तो परिक्षा केंद्रावर पोहचला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की या तरुणानं असं केलं तरी काय? तर या तरुणानं थेट पॅराग्लायडिंग करत परिक्षा केंद्र गाठलंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पाचगणी-महाबळेश्वरला जोडणाऱ्या मार्गावरील पसरणी घाट विभागातील हॅरिसन फॉली पॉइंटवरून एका विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी पॅराग्लायडिंगचा पर्याय निवडावा लागलाय. महाराष्ट्रातील वाई तालुक्यातील पसरणी गावातील समर्थ महांगडे या विद्यार्थ्याने परीक्षेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी चक्क पॅराग्लायडिंगचा वापर केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. परीक्षा सुरू होण्यास अवघी १५-२० मिनिटे शिल्लक असताना, महांगडे यांनी तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकण्याऐवजी पॅराग्लाइड करून कार्यक्रमस्थळी जाण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, समर्थला महाविद्यालयातील परीक्षेसाठी जायचे होते आणि परीक्षेला फक्त १५ ते २० मिनिटे शिल्लक होती. अशावेळी शहरातील वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी त्याने हा मार्ग निवडला. वाई पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती, त्यामुळे समर्थने पॅराग्लायडिंग करून परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या बॅगसह शाळेत पॅराग्लायडिंग करत प्रवेश केला. या व्हिडीओ पाहून आता नेटकरीही म्हणत आहेत, “सातारकरांचा नाद करायचा नाय”, “नाद करा पण सातारकरांचा कुठं.”

पाहा व्हिडीओ

नेमका कुठे आहे हा पसरणी घाट?

वाई-महाबळेश्वर मार्गावर पसरणी घाटाची वाट असून, या घाटातून धोम धरण, पसरणी गाव, पांडवगड, वाई शहराचं दृश्य पाहायला मिळतं. पसरणी घाटात पाचगणी-दांडेघर असे टप्पे असून, पावसाळ्यात निसर्गाची विविधरुपी उधळण घाटातून पाहायला मिळते. कधी घरी नेणारा तर कधी घरून निघणारा.. प्रत्येक वळणावर विविध विभ्रम दाखवणारा, विविध ऋतूंत रंगांचा बहर उडवून देणारा. कधी डोंगरच्या डोंगर वणव्यानं कातळ काळे झालेले, तर कधी पांगारा आणि पळस लालबुंद फुललेले

Story img Loader