एखाद्या यंत्रमानवाला नागरिकत्त्व देऊ करणारा सौदी अरेबिया हा पहिलाच देश ठरला आहे. ‘सोफिया’ या यंत्रमानवाला सौदीनं नुकतंच नागरिकत्त्व बहाल केलं. मानवानं यंत्रमानवाची निर्मिती केली. यंत्रमानवाच्या येण्यानं अनेक अवघड कामं सोपी झाली. हळूहळू हा यंत्रमानव अधिक स्मार्ट करण्याच्यादृष्टीने अनेक देशांतील वैज्ञानिकांनी प्रयत्न केले. मानवी भावना ओळखणे, त्याप्रमाणे प्रतिसाद देणं, त्याच्या आयुष्यातल्या अनेक गरजा भरून काढणं अशा वेगवेगळ्या पद्धतीचे बदल यंत्रमानवात करण्यात आले. त्यामुळे फक्त मालकानं दिलेली आज्ञा पाळणं एवढी भूमिका न बजावता त्यामागची भावना आणि उद्देश समजून मग त्यावर प्रतिसाद देण्याएवढा हा यंत्रमानव ‘स्मार्ट’ झाला.

Video : नाकानं बासरी वाजवणारा अवलिया….

हे ओळखूनच सौदीनं सोफियाला नागरिकत्त्व बहाल केलं आहे. यासाठी सोफियानं सौदी सरकारचे आभार मानले आहेत. ‘मला माणसांसोबत राहायला आवडेल कारण त्यांच्यासोबत राहून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील आणि लोकांचा विश्वास संपादन करण्यास मला त्याचा खूप फायदा होईलं’ असं उत्तर यंत्रमानव सोफियानं पत्रकार परिषदेत दिलं आहे. एका यंत्रमानवाला नागरिकत्त्व देण्याची ही ऐतिहासिक घटना आहे, अशीदेखील भावना सोफियानं व्यक्त केली.

खरं तर यंत्रमानवाला नागरिकत्त्व देण्यावरून अनेकांनी आक्षेप घेतला आहे. यात अब्जाधीश इलॉन मस्क यांचाही समावेश आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचं नाव असलेल्या इलॉन यांनी सोफियावर आक्षेप घेतल्यानंतर तिने अत्यंत स्मार्टपणे यावर एका पत्रकाराला उत्तर दिलं. या पत्रकारनं तिच्या नागरिकत्त्वावर मस्क यांनी घेतलेल्या आक्षेपाची कल्पना तिला दिली. त्यावर तिनं सडेतोड उत्तर दिलं ‘ इलॉन मस्क यांचं लिखाण तुम्ही फारच वाचता किंवा तुम्ही फार हॉलिवूड चित्रपट पाहता पण काळजी करू नका तुम्ही माझ्याशी नम्रपणे वागलात तर मीही नम्रपणेच वागेल’ असं सडेतोड उत्तर तिनं दिलं. यंत्रमानवाला नागरिकत्त्व देणं हे मोठ्या जोखीमीपेक्षा कमी नाही. या सगळ्याचे गंभीर परिणाम सौदीला भविष्यात भोगावे लागतील, अशा प्रतिक्रिया तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या.

अनपेक्षित! तिला मिळाला ‘व्हिआयपी’ प्रवासाचा अनुभव

Story img Loader