महिला अँकर आणि त्यांच्या बातम्या ही आपल्या देशात किंवा जगातही फार कौतुकाची गोष्ट नाही. खरं तर न्यूज चॅनेलवर महिला अँकरच जास्त असतात. पण सौदी अरेबियासारख्या देशासाठी मात्र महिला अँकरने बातम्या देणे ही गोष्ट खूपच आश्चर्याची आहे. यातही महिला म्हटल्यावर तिने सकाळच्या वेळेतील बातम्या देणे ठिक आहे. पण रात्रीच्य बातम्या महिलांनी देणे याठिकाणी काहीसे वेगळे मानले जाते. मात्र एका महिला पत्रकाराने नवा इतिहास रचला असून या देशात महिलाही रात्रीच्या न्यूज अँकरींगचे काम करु शकतात हे सिद्ध करुन दाखवले आहे. पहिल्यांदा राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या सौदी टीव्ही या न्यूज चॅनेलवर रात्रीच्या बुलेटीनमध्ये या महिला अँकरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मात्र हे बुलेटीन तिने एकटीने दिले नाही तर त्यावेळी तिच्यासोबत एक पुरुष सहकारीही होता. रात्री ९.३० च्या बातम्या देत सौदी अरेबियातील माध्यमात एक इतिहास रचला.
#فيديو | تحالف دعم الشرعية: عملياتنا مستمرة ضد السفن المشبوهة التي تهدد الملاحة الدولية في البحر الأحمر. pic.twitter.com/54xl02356f
— قناة السعودية
साधारणपणे याठिकाणी रात्रीची गंभीर बातमीपत्रे पुरुष देतात. तर स्त्रिया सकाळच्या वेळी हलक्या स्वरुपाच्या बातम्या सांगतात. यामध्ये पाककला, हवामान, महिलांशी निगडीत कार्यक्रम यांचा समावेश असतो. पण आता या महिला अँकरने रात्रीच्या बुलेटीनमध्ये गंभीर बातम्या देण्यात सहभाग घेतल्याने तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे नाव व्हीम अल दाखील असे तिचे नाव आहे. जुमान्ह अल्शामी हिने २०१६ मध्ये पहिल्यांदा न्यूज अँकरींग करुन या क्षेत्रात पाऊल टाकले होते. आता रात्रीच्या बातम्या महिला पत्रकाराने देण्याबद्दल चॅनेलच्या ट्विटर हँडलवरुन अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.