Saudi Robot ‘Android Muhammad’ Sexually Harasses Female News Reporter: सध्या अनेक क्षेत्रांत रोबोटचा वापर वाढताना दिसतोय. अनेक कामांसाठी रोबोटची मदत घेतली जाते. अशा प्रकारे सौदी अरेबियातही मुहम्मद नावाचा एक पहिला पुरुष रोबोट तयार करण्यात आला. AI क्षेत्रातील देशातील प्रगती दर्शविण्यासाठी हा रोबोट बनविण्यात आला आहे. अलीकडेच मोहम्मद रोबोटच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. पण, भरकार्यक्रमात रोबोटने एका महिला पत्रकाराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, राविया अल-कासिमी नावाची महिला पत्रकार रोबोटच्या जवळ उभी राहून रिपोर्टिंग करीत असते. त्याच वेळी रोबोट चुकीच्या पद्धतीने तिला स्पर्श करीत असल्याचे दिसतेय. या सर्व प्रकारामुळे ती थोडी घाबरते; पण चेहऱ्यावर न दाखविता, ती आपले रिपोर्टिंग सुरूच ठेवते. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे; जो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

या व्हिडीओतील प्रकार तांत्रिक समस्या झाल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे; तर काहींनी असे म्हटले की, हातांची हालचाल नैसर्गिक होती आणि रिपोर्टर रोबोटच्या अगदी जवळ उभी होती. पण, अनेकांना रोबोटची ही कृती अजिबात आवडलेली नाही; ज्यावर ते एआय तंत्रज्ञान खरंच विचित्र असल्याचे म्हणत आहेत.