सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट पटकन व्हायरल होते. काही भन्नाट कल्पना अचंबित करणाऱ्या असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत एक एसबीआय कर्मचारी ऑफिसला एका लक्षवेधी रूपात आलेला दिसत आहे. या कर्मचाऱ्याकडे पाहुन नक्कीच तिथल्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एसबीआय कर्मचाऱ्याने ओनम सण साजरा करण्यासाठी थेट राजा महाबलीच्या रूपात ऑफिसला हजेरी लावलेली दिसत आहे. हा व्हिडीओ निकसॉन जोसेफ यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांच्या या भन्नाट कल्पनेचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ३०,००० हजारांहून अधिक जणांनी पाहिला आहे. राजा महाबली यांच्या घरी परतण्याचा आनंद साजरा करण्यासाठी ओनम हा सण केरळमध्ये साजरा केला जातो. तसेच या सणामध्ये कापणीचा हंगाम देखील साजरा केला जातो.

आणखी वाचा : Viral Video : कार स्टंट करायला गेले अन् झाला मनस्ताप; व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
‘राजा महाबली ज्यांची भेट वर्षातून एकदा ओनमच्या दिवशी होते, त्यांच्या रूपात एसबीआय कर्मचारी डिस्पेन्सिंग सर्व्हिस करत आहेत. या कर्मचाऱ्याच्या या विचाराला आणि जिद्दीला सलाम.’ असे कॅप्शन निकसॉन जोसेफ यांनी व्हिडीओला दिले आहे.

ट्विटरवर अनेक जणांनी एसबीआय कर्मचाऱ्याच्या या कृतीचे कौतुक केले आहे. सण साजरा करण्याचा हा उत्साह नेटकऱ्यांना भावला आहे. पाहूया नेटकऱ्यांची प्रतिक्रिया.

आणखी वाचा : KGF मधील रॉकी स्टाइल गणपतीवरुन वाद; अनेकांना पटली नाही संकल्पना, जाणून घ्या नेमकं प्रकरण