-अंकिता देशकर

SBI Chief Against Modi Fact Check: ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला एक पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला व्हायरल होत असल्याचे आढळले. या पोस्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य ह्यांनी निवृत्तीनंतर असे वक्तव्य केले की, “मोदीराजमध्ये बोलण्याचे स्वातंत्र्य नाही.” माजी एसबीआय अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य आता सालसफोर्स इंडियाच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत, त्यांनी हे व्हायरल वक्तव्य मुळात केले की नाही याचा तपास ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने स्वतः अरुंधती भट्टाचार्य यांच्यासह बोलून केला आहे.

राजकारणी आणि पूर्व क्रिकेटर, कीर्ती आझाद यांनी व्हायरल पोस्ट शेअर करीत हिंदीमध्ये लिहिले होते की,”इसको गोदी मीडिया नहीं रिपोर्ट करेगा|”

भाषांतर: या प्रकरणाला गोदी मीडिया रिपोर्ट करणार नाही.

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने गूगल कीवर्डचा वापर करून तपास केला असता, अरुंधती भट्टाचार्य यांनी असे वक्तव्य केल्याची कुठलीच अधिकृत बातमी आम्हाला सापडली नाही. पण एका रिपोर्टमध्ये, अरुंधती भट्टाचार्य यांनी नोटाबंदी जाहीर झाल्यानंतरच्या आव्हानांबद्दल सांगितले होते.

“नोटाबंदीच्या वेळी आम्हाला ३६ तासांची नोटीस मिळाली होती. आम्हाला संध्याकाळी ८ वाजता सांगण्यात आले की दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल, परवा सकाळी १० वाजता नवीन नोटांसह तुमचे काउंटर उघडा. आणि त्या वेळी मला नवीन नोटा कुठे आहेत हे देखील माहीत नव्हते. मला माहीत होते की ते करन्सी चेस्टमध्ये आहेत परंतु जे लोक करन्सी चेस्टचे प्रभारी होते त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेने नॉन-डिक्लोजर करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले होते,” भट्टाचार्य म्हणाल्या.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात, ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने पूर्व एसबीआय अध्यक्ष यांना फोनद्वारे संपर्क केला. अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, “माझ्या नावाने व्हायरल होत असलेली पोस्ट पूर्णपणे खोटी आहे. लोक माझे २०१७ पूर्वीचे छायाचित्र वापरत आहेत, ज्यात माझ्यामागे एसबीआयचा लोगो दिसतोय, आणि त्या फोटोसह हे खोटे वक्तव्य व्हायरल करीत आहेत.”

हे ही वाचा<< प्रभू श्रीराम बुर्ज खलिफावर झळकले? रामनवमीपासून तुफान Viral होतेय एकच पोस्ट, नेमकं चुकलं कुठे?

निष्कर्ष: एसबीआयच्या पूर्व अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य ह्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात वक्तव्य केले नाही, व्हायरल वक्तव्य खोटे आहे.

Story img Loader