Teen Outsmarts Cyber Fraud: लोकांना फसवून लुटण्यासाठी सायबर गुन्हेगार सातत्याने नवनवीन युक्त्या शोधत आहे. वडीलांचा मित्र आहे असे सांगून फसवणूक करण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सुरू आहे. सायबर गुन्हेगार वडीलांचा मित्र आहे असून कॉल करतो आणि वडीलांनी पैसे देण्यास सांगितले असे सांगून मुद्दाम जास्तीचे पेसै पाठवतो. जास्तीचे पैसे परत करण्याच्या कार देऊन ग्राहकांची आर्थिक माहिती गोळा करून त्यांच्या खात्यातील पैसे काढून घेतो. अनेकांना अशाच प्रकारचे कॉल यापूर्वी आले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करून अशा लोकांपासून सावध राहण्याची सुचनाही दिली. वडीलांचा मित्र आहे सांगून फसवणूक करू पाहणाऱ्या सायबर गुन्हेगाराला एका तरुणींने चांगलाच धडला शिकवला आहे.
स्कॅमरबरोबर तरुणीने केला स्कॅम
X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तरुणी एका सायबर गुन्हेगाराशी फोनवर बोलत आहे. तो वडीलांचा मित्र असल्याचा दावा करतो. पण तरुणीच्या हे लक्षात येते की तो फसवणूक करत आहे पण ती सायबर गुन्हेगार जे सांगतो ते सर्व शांतपणे ऐकून घेते. सायबर गुन्हेगार किशोरी नावाच्या या तरुणीला सांगतो की, त्याच्या वडीलांनी तिच्या युपीआय खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले आहे. तरुणी त्याला म्हणते की वडीलांनी काही सागितले नाही.
सायबर गुन्हेगाराने सांगितले की, त्याने तिला युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) साठी १२,००० रुपये पाठवणार आहे. आधी तो तिला १०,००० रुपये पाठवण्यास सांगतो. तिने १०,००० रुपये काढले आहेत आणि त्याच्या फोनवर एक खोटा एसएमएस फॉरवर्ड केला होता. मुलीने पाहिले की, तो एसएमएस बँकेचा नाही तर त्याच्या वैयक्तिक नंबरवरून आला होता. त्यानंतर, त्या माणसाने सांगितले की, त्याने त्याला २००० ऐवजी २०,००० रुपये दिले आहेत आणि आता त्याला १८,००० रुपये परत हवे आहेत.
पाहा Viral Video
तरुणीने असा पलटला सायबर गुन्हेगाराचा खेळ
पण, हुशार मुलीने तो बनावट एसएमएस एडिट केला आणि त्याला परत पाठवला की, तिने त्याला १८,००० रुपये परत पाठवले आहेत. तो म्हणाला, “हे बघा, मी तुला १८,००० रुपयेही पाठवले आहेत.” हे पाहून, फसवणूक करणाऱ्याला धक्का बसला आणि शेवटी त्याने पराभव स्वीकारला आणि म्हणाला, “मानलं पोरी तुला आणि मग फोन डिस्कनेक्ट केला.
तरुणीचे प्रसंगावधान आणि हुशारी पाहून सायबर गुन्हेगारही थक्क झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने तिचे कौतुकही केले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओने अनेक वापरकर्त्यांचे लक्ष वेधले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, “ती खूप हुशार मुलगी आहे आणि तिचा बुद्ध्यांक देखील खूप चांगला आहे.” दुसऱ्याने कमेंट केली की, “ही एक उत्तम हुशारी होती.” तिसऱ्याने म्हटले की, “लोक UPI अॅपमध्ये चेक करण्याऐवजी SMS वर विश्वास का ठेवतात, जे खूप सोपे काम आहे.”