प्रत्येक पालक आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करतात, त्यांची काळजी घेतात, वेळेप्रसंगी ओरडतात, मारतात. पण त्यांचे प्रेम कधीच कमी होत नाही. मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी छोट्या- मोठ्या गोष्टींची काळजी घेतात. त्याला काही दुखले-घुपले तर आई घर डोक्यावर घेते, प्रत्येक आईची हीच सवय असते. यामुळे अनेकदा लहान मुलं खूप हट्टी होतात आणि ती पुढे आई- वडिलांचेही ऐकत नाहीत. अशावेळी आई मुलाला घाबरवण्याची एक सर्वात जुनी पद्धत वापरते जी कधीच अयशस्वी होत नाही. भारतात बहुतांश आईंनी मुलांना घाबरवण्यासाठी, दम देण्यासाठी ही पद्धत अनेकदा वापरली असेल, ती पद्धत म्हणते चप्पल. ज्याला पाहून प्रत्येक मूल मुकाट्याने आईच्या प्रत्येक गोष्टी ऐकते. सध्या सोशल मीडियावर चप्पल दाखवत मुलाला दम देणारी आई तुफान व्हायरल होत आहे.

ट्विटरवर @Figensport या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतेय की, एक हट्टी मुलं लाकडी कपाटात जाणून लपलेले असते. यावेळी आईने अनेकदा सांगूनही तो बाहेर येत नाही. यानंतर आईने पायातून चप्पल काढून हातात धरली आणि बाहेर येण्यास सांगितले, यावेळी आईची चप्पल पाहून ते हट्टी मूल घाबरून बाहेर येत धूम ठोकून पळून गेले. या व्हिडिओला आत्तापर्यत १२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Mother making reels while holding baby in building open terrace shocking video goes viral
एका रीलसाठी आईनं हद्दच पार केली; पोटच्या लेकराला बिल्डिंगच्या टोकावर बसवलं अन्…काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण
young bachelors planning to make chicken
Video : चिकनचा बेत आखला अन् ऐनवेळी गॅस गेला, तरुणांनी केला भन्नाट असा जुगाड
Dombivali Viral Video Dombivli Child Falls From Building 3rd Floor bhavesh mhatre explain incidence video viral
VIDEO…खरंच देवासारखा धावलास! २ वर्षाचं लेकरु तिसऱ्या माळ्यावरुन पडलं अन् एकट्याच्या चपळाईनं कुटुंब वाचलं; नेमकं काय घडलं त्यानंच सांगितलं
A Father fights to save 9 years old daughter with a tiger shocking video goes viral on social Media
बाप तो बापच असतो! नऊ वर्षाच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी वाघाशी भिडला बाप; VIDEO पाहून थरकाप उडेल
Viral Video Of pet dog
VIDEO: ‘भिंतीवर टांगून ठेवेन…’ घरात वस्तूंची फेकाफेकी करणाऱ्या श्वानाची आईने काढली खरडपट्टी; पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही हसाल

आईच्या चप्पलला तोड नाही

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक आई आणि मूल एका फर्निचरच्या दुकानात दिसत आहे. यादरम्यान मूल एका छोट्या लाकडी कपाटात लपते, ते पाहून आई वारंवार त्याला बाहेर येण्यास सांगते, मुलाला वारंवार सांगूनही ते बाहेर येण्यास नकार देते आणि कपाटात बसून आनंद घेत असतो. यावेळी मुलाचा हट्टीपणा खूप वाढला तेव्हा आईची सहनशीलताही संपते. यावेळी आईने पायातली चप्पल हातात धरली, चप्पल बघायचं ते बिचार मुलं कपाटातून बाहेर आले आणि पळून गेले.

कामाचा अर्थ मज्जा-मस्ती नाही, तुमची मैत्री ऑफिसबाहेर जपा! बॉसचे जबरदस्त फर्मान इंटरनेटवर Viral

आईच्या चप्पलची कमाल

आईच्या हातातून चप्पल निसटून जाताच मूल ज्याप्रकारे पळून जाते ते पाहून तुम्हाला हसू रोखणे कठीण होईल, अनेकांना हा व्हिडीओ पाहून त्यांचे जुने दिवस आठवले, जेव्हा त्यांची आई त्यांनी अशाचप्रकारे दम देत होती. अनेकांनी या व्हायरल व्हिडीओवर बालपणीचे आईच्या हातून मार खाल्लेले अनुभव शेअर केले आहे.

आपल्या देशात आईच्या अशा काही ‘शस्त्रांचा’ उल्लेख केला जातो, ज्यांचा वापर खास मुलांना धडा शिकवण्यासाठी केला जात होता. व्हिडिओचे कॅप्शनही मजेशीर आहे, ज्यामध्ये लिहिले आहे- शिस्तीसाठी आईची चप्पल ही सर्वात प्रभावी पद्धत आहे. आईच्या चप्पलचा मार आपण सर्वांनी अनुभवला आहे!. यावर एका यूजरने लिहिले की, याला शिस्त म्हणतात आणि आजकाल काही मुलांकडे पाहता, याची जास्त गरज आहे.

Story img Loader