अनेक जण घर सजवण्यासाठी, घरात समृद्धी, सौभाग्य वाढवण्यासाठी घराच्या भिंतींवर विविध प्रकारचे फोटो लावतात. फक्त लिव्हिंग रुममध्येच नाही तर प्रत्येक खोलीत, पॅसेजमध्ये विविध फोटो लावून घराची शोभा आणखी वाढवली जाते. पण, एका पठ्ठ्याने घरात नाही तर घराच्या बाहेर महिलेचा असा एक फोटो टांगला आहे, जो पाहून माणसंच काय भूतही दूर पळून जातील. सध्या सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय, ज्यातील महिलेचा फोटो पाहिल्यानंतर बहुतेकांना हसू आवरणे अवघड झाले आहे.
घराबाहेर टांगला असा फोटो पाहून भूतही पळेल
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बांधकामाधीन घर आहे, वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी या घरावर नजरबट्टूबरोबर एका महिलेचा फोटो टांगण्यात आला आहे. माथ्यावर कुंकवाचा भला मोठा टिळा अन् विस्फारलेल्या नजरेने पाहणाऱ्या महिलेचा फोटो दूरून दिसतानाच फार भयानक दिसतोय. घराच्या बांधकामाचे सामान चोरीला जाऊ नये म्हणून मालकाने हा फोटो लावल्याचे बोलले जात आहे. कारण घरावर असा फोटो पाहिल्यानंतर रात्री काय दिवसाही कोणाची घरात जाण्याची हिंमत होणार नाही. पण, फोटो पाहून अनेक युजर्स पोट धरून हसतायत. अनेकांनी या फोटोवर मजेशीर अशा कमेंट्स केल्या आहेत.
आपल्या देशात बांधकाम सुरू असलेल्या घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी अनेक जण नजरबट्टूला छतावर लटकवतात. यामुळे घराचे वाईट नजरेपासून संरक्षण होते असा समज आहे, त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या अनेक घरांवर तुम्हाला लहान-मोठा नजरबटूटचा पुतळा लटकवलेला दिसून येईल, पण या घरावर नजरबट्टूबरोबर विस्फारलेल्या नजरेने पाहणाऱ्या महिलेचा फोटो लटकवलेला दिसतोय.
एअर शोदरम्यान मृत्यूचा थरार, दोन विमानांची हवेत टक्कर, पायलटचा जागीच मृत्यू; भीषण अपघाताचा Video
हा मजेशीर व्हिडीओ @kishor_bbq नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिला आहे. हा मजेदार व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे, अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या.
“या घराला आयुष्यात कधी नजर लागणार नाही.”, युजरची प्रतिक्रिया
युजर्स कमेंट सेक्शनमध्ये या व्हिडीओवर युजर्सदेखील भन्नाट भन्नाट प्रतिक्रियादेखील देत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “हे पाहून भूतही पळून जाईल.” आणखी एका युजरने लिहिले की, “या घराला आयुष्यात कधी नजर लागणार नाही.” तिसऱ्या युजरने लिहिले की, “दिवसा हे पाहून तुम्हाला भीती वाटत असेल तर रात्री काय होईल?”