समुद्रकिनाऱ्यावर वावरताना सतर्क राहण्याचे आवाहन नेहमी केले जाते. अनेकदा सोशल मीडियावर समुद्राच्या लाटेबरोबर लोक वाहून गेल्याचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. समुद्र जेवढा पाहायला सुंदर, निळाभोर अन् शांत वाटतो तेवढाच तो खवळल्यावर रौद्र रूप धारण करतो. त्यामुळे त्याच्या जवळ जाणे जेवढे छान तेवढेच ते धोकादायकही आहे. समुद्राच्या मोठ्या लाटांमुळे अनेक धोकादायक दुर्घटना घडतात.

समुद्राच्या आसपास नेहमीच मोठ्या लाटांचा, पूर येण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. असे म्हणतात की, समुद्र जितका शांत तितकाच तो भयावह दिसतो. असाच काहीसा प्रकार रशियात घडला आहे. खूप छान वातावरण असताना अचानक समुद्राने एवढे भयंकर रूप धारण केले की, त्याकडे पाहत असलेल्या एका स्त्रीला जणू त्याने ओढून घेतले. रशियामधल्या सोची येथील हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक जोडपे समुद्रकिनारी उभे असते. पुढे या तरुणीबरोबर असे काही होते की, क्षणभरासाठी तुमच्याही अंगावर काटा येईल.

Haldi Ceremony Viral Video
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Premachi Goshta
Video : सईला मिळवण्यासाठी मुक्ताचं सावनीला खुलं आव्हान; म्हणाली, “पुढच्या ४ दिवसांत माझी मुलगी…”
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच

(हे ही वाचा : रेल्वेमध्ये स्वस्तात विकल्या जाणाऱ्या वस्तू खरेदी करताय? प्रवाशांनी फेक पॉवर बँक विक्रेत्याचा कसा केला भांडाफोड? एकदा Video पाहा )

खरे तर बीचवर एक जोडपे हातात हात घालून फिरत होते. अचानक एवढी भीषण लाट आली की, त्यामुळे त्यातील मुलीचा तोल गेला. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, तिच्या प्रियकराने तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला; पण पुढच्या लाटेसरशी ती महिला अधिक आत ओढली जात, बुडून नाहीशी झाली. तिचा प्रियकर तिला वारंवार शोधण्याचा प्रयत्न करतो; पण ती सापडत नाही.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहाल की, मुलीचा प्रियकर त्या संकटाने घाबरून जाऊन, आपल्या प्रियतमेला शोधण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत इकडे-तिकडे धावत आहे. कधी तो समुद्राकडे जाण्याचा प्रयत्न करतोय; तर कधी लाटा पाहून दु:खी चेहऱ्याने परत येतो. हा व्हिडीओ @CollinRugg ने X वर शेअर केला आहे. ही दुर्घटना १६ जून रोजी घडली. ती २० वर्षीय दुर्दैवी तरुणी तिच्या प्रियकरासोबत बीचवर गेली होती.

शोधमोहीम सुरूच

कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्या बुडालेल्या तरुणीचा शोध घेऊनही अद्याप काहीही मागमूस सापडलेला नाही. वृत्तानुसार, शोध पथकाने आपले क्षेत्रही वाढवूनही काहीही हाती लागलेले नाही. तीन दिवसांपासून ही शोधमोहीम सुरू आहे. या व्हिडीओला आतापर्यंत सात मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

(23) Collin Rugg on X: “Woman gets swept out to sea as her boyfriend frantically tries to help save her in Sochi, Russia. Devastating. The incident reportedly happened while the couple was visiting from the Russian city of Lipetsk. The couple could be seen going to the water’s edge when massive waves… https://t.co/zEaFXoDjkg” / X

निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे काही युजर्सचे म्हणणे आहे. काही युजर्स असेही म्हणत आहेत की, सुरुवातीला तरुण आपल्या प्रेयसीला न जाण्यास सांगत होता; पण ती मान्य करत नव्हती. शेवटी तो तरुण वाचला; पण ती मुलगी अद्याप सापडलेली नाही.

Story img Loader