School Bans All Forms Of Physical Contact : शाळेतील विद्यार्थी मित्र मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी करत असताना अनेकदा भावनेच्या ओघात मिठी मारणे, हात मिळवण्याचा प्रयत्त करत असतात. पण विद्यार्थ्यांच्या अशा वागण्यामुळं ते थेट शारिरीक संपर्कात येतात, असा दावा इंग्लंडच्या एका शाळेय व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा शारिरीक संपर्क होऊ नये, यासाठी शाळेकडून खळबळजनक फतवा काढण्यात आलाय. इंग्लंडच्या चेम्सफोर्ड येथील हायलॅंड शाळेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या शारिरीक संपर्कात येण्यात मज्जाव घालण्यात आला आहे. शारिरीक संपर्कास बंदी घालण्याच्या शाळेच्या या फतव्यवरून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. रिपोर्ट्सनुसार, मिठी मारणे, हात मिळवणे अशा प्रकारचा कोणताही शारिरीक संपर्क शालेय व्यवस्थापनाच्या नियमांचा उल्लंघन करणारा असेल, असं पत्र शाळेकडून जाहीर करण्यात आलं आहे.
…म्हणून पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनावर व्यक्त केली नाराजी
डेली मेल रिपोर्ट्सनुसार, इंग्लंडच्या चेम्सफोर्ड येथील हायलॅंड शाळेत ही कठोर नियमावली करण्यात आली आहे. याबाबत शालेय व्यवस्थापनाकडून पालकांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या शरिरीक संपर्कास येण्यात विद्यार्थ्यांना बंदी घालण्यात आलीय, अशा प्रकारच्या सूचना पालकांना देण्यात आल्या आहे. पत्रात असं म्हटलं आहे की, तुमच्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी ही नियमावली करण्यात आली आहे. जर तुमची मुलं एखाद्याला स्पर्श करत असतील, यासाठी एखाद्याने संमती दिली असेल किंवा नसेल, काहीही घडू शकतं. यामुळं एखादी घटना घडण्याची शक्यता आहे. एखाद्याला अशा कृतीमुळे धक्का बसू शकतो. चुकीचा स्पर्श केल्याने एखाद्याला या गोष्टींचा त्रास होऊ शकतो.
शारिरीक संपर्कात न येण्याच्या नियमासोबत शाळेय परिसरात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आलीय. जर एखादा विद्यार्थी शाळेत आल्यावर त्याच्याकडे मोबाईल सापडला, तर त्याचा डिवाईस जप्त केला जाईल, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. शाळेय समितीकडून ही कठोर नियमावली जाहीर केल्यानंतर पालकांना नाराजी व्यक्त केली आहे. शाळेच्या धोरणांवर पालकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. पत्रव्यवहार करण्याआधी शाळेकडून कोणत्याही याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती, असं एका पालकाने म्हटलं आहे. “मला यावर विश्वासच बसला नाही. चुकीचा स्पर्श केल्यावर एखादी वाईट घटना घडू शकते, ते मला मान्य आहे. पण शाळेकडून विद्यार्थ्यांना कोणात स्पर्श चांगला, कोणता स्पर्श वाईट,याबाबत शिक्षण देण्यात येत नाही,”अशी प्रतिक्रियाही एका पालकाने दिली आहे.