पबजी मोबाईल गेम जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. मोबाईलवर पबजी खेळता खेळता पाकिस्तानच्या सीमा हैदरचं भारताच्या सचिनसोबत प्रेम जडलं आणि तीन पतीला सोडून चार मुलांसोबत भारतात आली. पबजी मोबाईल गेमच्या व्यसनाने काही जणांना जखडून ठेवल्यानं त्यांच्या करिअरमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. ८ वी उत्तीर्ण झाल्यानंतर अकबरपूरच्या एका शाळेत अॅडमिशन घेण्यासाठी एका मुलाने कुटुंबियांकडून शाळेची फी भरण्यासाठी दीड ते दोन लाख रुपये घेतले पण त्यानंतर त्या मुलाने पबजी खेळण्याच्या व्यसनात हे सर्व पैसे उडवले. रामजी पाल असं या मुलाचं नाव असून पबजी गेममुळे त्यानं त्याचं करिअर उद्ध्वस्त केलं. हा संपूर्ण धक्कदायक प्रकार समोर आल्यानंतर रामजीच्या कुटुंबियांना धक्काच बसला आहे.
रामजीला जडलं पबजी खेळण्याचं व्यसन
इयत्ता ८ वी उत्तीर्ण झाल्यानंतर रामजीला पबजी मोबाईलचं व्यसन जडलं. त्यानंतर त्याला पैशांची गरज लागली. आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी रामजीने घरच्या मंडळींना अॅडमिशनचं कारण देत दीड ते दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर तो नियमितपणे शाळेत जाऊ लागला. खोटा निकाल दाखवून घरच्यांना विश्वासात ठेवलं. हळूहळू दोन वर्ष पालटले पण त्याचे कुटंबिय जेव्हा ब्राईट एंजल शाळेत पोहोचले त्यावेळी रामजी गायब झाल्याचं त्यांना कळलं. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
विद्यार्थ्याचं मानसिक संतुलन बिघडलं
शाळेतील एका शिक्षकाने सांगितलं की, रामजी पाल नावाचा विद्यार्थी या शाळेत नाहीय. त्यानंतर रामजीच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तो गायब झाल्याची नोंद केली. त्यानंतर कानपूर पोलिसांनी हरवलेल्या रामजीला शोधलं आणि त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. कुटुंबियांनी रामजीची अवस्था पाहिली अन् सर्वांना आवाहन करत सांगितलं की, कुणीही मुलांना मोबाईवर गेम खेळायला देऊ नका.