School Boy Viral Video : ‘गदर २’ या चित्रपटाने संपूर्ण देशभरात धुमाकूळ घातला आहे. भारत-पाकिस्तानच्या संस्कृतीवर आधारित असणारा हा चित्रपट तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या चित्रपटातील गाण्यांच्या बोलबालाही सुरु आहे. मात्र, सध्याच्या घडीला एका शाळकरी मुलाचं सर्वत्र कौतुक होत आहे. कारण अभिनेता सनी दिओल स्टारर बॉर्डर चित्रपटातील देशभक्तीपर गीत ‘संदेसे आते है’ गाण्याची चर्चाही इंटरनेटवर रंगलीय. कारण या चिमुकल्यानं अतिशय मधूर आवाजात हे गाणं गायलं असून नेटकऱ्यांसह देशातील तमाम नागरिक गाणं ऐकून भावुक झाले आहेत. देशवासीयांची मनं जिंकणाऱ्या या विद्यार्थ्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या विद्यार्थ्यानं शाळेतील एका कार्यक्रमात संदेसे आते है गाण्याचं जबरदस्त सादरीकरण केलं. हे गाणं ऐकूण शाळेतील विद्यार्थ्यांसह उपस्थित सर्व मान्यवर भावुक झाल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हे गाणं अगदी मनापासून ऐकल्यावर तुमच्याही मनात देशाप्रती अधिक मानसन्मान आणि प्रेम वाढल्याशिवाय राहणार नाही. बॉर्डर चित्रपट प्रदर्शित झाला अन् काही दिवसांतच बॉक्स ऑफिसवर गाजला.

नक्की वाचा – Viral Video : पिसाळलेल्या हत्तीने प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसवर केला हल्ला, जीव मुठीत घेऊन प्रवासी पळाला

इथे पाहा व्हिडीओ

देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांवर आधारीत हा चित्रपट आहे. आपल्या कुटुंबाचा त्याग करुन देशसेवेसाठी सदैव तत्पर राहणारे सैनिक जीवाची बाजी लावतात आणि शहिद होतात. हे भावनिक दृष्य दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ‘संदेसे आते है’ हे गाणं गायक सोनु निगम आणि रुपकुमार राठोड यांनी गायलं आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त किंवा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला हे गाणं संपूर्ण देशभरात दुमदुमतं. शाळांमध्ये किंवा सार्वजनिक कार्यक्रमात गाण्याची मधूर संगीत नक्कीच ऐकायला मिळतं.