Todays Viral News : महिंद्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय राहून नवनवीन प्रेरणादायी व्हिडीओ शेअर करत असतात. लोकांना व्हिडीओच्या माध्यमातून नव्या संकल्पनांबाबत माहिती मिळावी यासाठी महिंद्रा त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर व्हिडीओज पोस्ट करतात. पण आता काहिसं वेगळं घडलं आहे. नेहमी प्रेरणादायी ठरणाऱ्या महिंद्रा मुलांच्या बुद्धीबळाचा डाव पाहून स्वत:च प्रेरित झाले आहेत. बुद्धीबळ खेळणाऱ्या मुलांची जिद्द पाहून त्यांच्या मनात चेस ग्रॅंड मास्टर मैग्नस कार्लसन यांच्यासारखं बनण्याचं इच्छा कुठतरी दडलीय, असं व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्की म्हणता येईल. तामिळनाडूच्या होसरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बुद्धीबळ स्पर्धेचे फोटो व्हायरल झाले आहेत. पण खुर्चीवर झोपलेल्या मुलावर सर्वांच्या नजरा का लागल्या, यामागचं कारणंही तुम्हाला चक्रावून सोडेल.
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण काही पोस्ट लोकांसाठी प्रेरणादायी ठरतात. या फोटोकडे तुम्ही बारकाईने पाहिलं तर यामध्येही तु्म्हाला प्रेरित झाल्यासारखं वाटेल. खुर्चीत झोपलेल्या मुलानं लोकांना जबरदस्त मोटिवेट केलं आहे. होसुरमध्ये बुद्धीबळ खेळण्यासाठी वेळेवर पोहोचता यावा, यासाठी या मुलाने रात्रभर लांबचा प्रवास केला. एक नव्हे तर दोन दोन बस पकडून हा मुलगा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला. बुद्धीबळाचा डाव सुरु होण्यासाठी रात्रभर जागलेल्या मुलगा डुलकी देऊन स्वत:ला रिफ्रेश करण्याचा प्रयत्न करतो. ही त्या मुलाची जिद्दच म्हणावी लागेल, कारण रात्रभर कित्येक किमीचा प्रवास करुनही मनात चेस चॅम्पियन बनण्याची इच्छा कायम आहे, असंच ही व्हायरल पोस्ट पाहिल्यानंतर म्हणता येईल.
इथे पाहा पोस्ट
या मुलाकडून आनंद महिंद्रांनाही मिळाली प्रेरणा
आनंद महिंद्रा यांनी बुद्धीबळ खेळतानाचा या मुलाचा फोटो त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं, होसुरमध्ये एका शाळेत बुद्धीबळाच्या स्पर्धेत १६०० मुलांनी सहभाग घेतला होता. पण या मुलाने रात्रभर बसने प्रवास केला आहे. दोन वेळा बस बदलून पुन्हा डेपोतून चालत गेला. सामना सुरु होण्याआधी डुलकी दिली. या मुलाला भविष्यातील मैग्नस बनायचं आहे. या मुलासारखी माणसं भारतातील भविष्याला आकार देतात. हा मुलगा माझा मंडे मोटिवेशन आहे. या फोटोला नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रिया देत मुलाचं कौतुक केलं आहे. एकाने लिहिलं, “यशस्वी होण्यासाठी समर्पण आणि भूख..” तर अन्य एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “खरंच प्रेरणादायी.”