Viral Video : कुटूंबाला आर्थिक मदत करण्याची इच्छा प्रत्येक व्यक्तीची असते. शिक्षणानंतर नोकरी किंवा व्यवसाय करून कुटूंबाला आर्थिक आधार द्यावा, असे प्रत्येकाला वाटते पण आज आपण एका अशा मुलाची भावनिक स्टोरी जाणून घेणार आहोत, जी वाचून तुम्हीही भारावून जाल. नववी दहावीत शिकणारे मुलं तुम्ही अभ्यास करताना किंवा मित्रांबरोबर मनसोक्त खेळतात पाहिले असतील पण आज आपण एका अशा दहावीत शिकणाऱ्या मुलाविषयी जाणून घेणार आहोत जो कुटूंबाला मदत करण्यासाठी फूड स्टॉल चालवतो. सध्या सोशल मीडियावर या शाळकरी मुलाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या मुलाचा संघर्ष वाचून तुम्हालाही अश्रु आवरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ

या मुलाचा व्हिडीओ पाहून युजर्स भावनिक झाले. व्हिडीओत तुम्हाला एक मुलगा दिसेल. तो त्याच्याविषयी सांगतो की त्याचे वडिलांचा लिव्हरच्या आजारामुळे चार महिन्यापूर्वीच मृत्यू झाला. चार महिन्यापासून आई आणि दोन बहिणींना सांभाळायची जबाबदारी त्याने घेतली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटूंबाला सांभाळण्यासाठी या शाळकरी मुलाने वडिलांचा फूड स्टॉल चालवण्याचा निर्णय घेतला. तो प्रायव्हेट शाळेत शिक्षण घेत असून दहाव्या वर्गात आहे आणि त्याच बरोबर वडिलांचा हा व्यवसाय सुद्धा चालवतो. हा व्हिडीओ पंजाब राज्यातील असून त्याचा हा फूड स्टॉल जालंधरमध्ये आदर्श नगर येथे आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हा शाळकरी मुलगा खूप सुंदर चाट तयार करताना दिसतो.

हेही वाचा : Pune : पुण्याचा तरुण करणार पुणे ते अयोध्या १५०० किमीचा पायी प्रवास, व्हिडीओ होतोय व्हायरल

नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्स व्हिडीओ पाहून भावूक झाले आहे तर काही युजर्सनी या शाळकरी मुलावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “वाहेगुरूची तुझ्यावर नेहमी कृपा असावी” तर एका युजरने लिहिलेय, “त्या पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन द्या” आणखी एका युजरने लिहिलेय, “त्याच्या आवाजात वेदना जाणवतात” एक युजर लिहितो, “मी जेव्हा केव्हा पण पंजाबला जाईन तेव्हा या ठिकाणी मी नक्की भेट देणार”

foodpandits या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “या तरुणाला नक्की सहकार्य करा. आदर्श नगर चौपाटी, जालंधर, पंजाब. सोमवारी – सुट्टी, सायंकाळी साडे चार ते रात्री साडे दहा”