Viral Video: समाजमाध्यमांवर लहान मुलांचेदेखील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हल्लीच्या लहान मुलांचे अभ्यासापेक्षा सोशल मीडियाच्या ट्रेंडवर आणि रिल्सवर अचूक लक्ष असते. चर्चेत येणारी नवनवीन गाणी, त्यातील डान्स स्टेपही ते क्षणात शिकतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय; ज्यात एक शालेय विद्यार्थी शाळेतील समारंभात बॉलीवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या विद्यार्थ्याचा डान्स पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजकालची लहान मुलं आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचंय. हे स्वतः ठरवतात आणि त्यानुसार आपले छंद जोपासतात. काहींना अभिनयाची आवड असते. तर, काहींना नृत्याची आवड असते. प्रत्येक वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक गाणी, आयटम साँग प्रदर्शित होतात; ज्यावर अनेकजण रिल्स बनवताना दिसतात. आयटम साँगवर नृत्य करणाऱ्या अनेक तरूणींचे, महिलांचे डान्स तुम्ही आजवर पाहिले असतील. पण, आज व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक शालेय विद्यार्थी आयटम साँगवर डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक शालेय विद्यार्थी त्याच्या शाळेतील समारंभामध्ये स्टेजवर उभा राहून सर्वांसमोर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी तो “दिलबर दिलबर” या हिंदी चित्रपटातील गाण्यावर डान्स करत आहे. विद्यार्थी करत असलेला डान्स पाहून अनेकजण भारावून गेले. त्याच्या डान्स स्टेप्ससह त्याच्या चेहऱ्यावरचे कमालीचे हावभाव अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मुलाचे ठुमके पाहून स्टेजवर उपस्थित शिक्षक त्याच्याकडे कौतुकाने पाहत आहेत.

हेही वाचा: ‘देवा, असे आई-वडील कोणालाच देऊ नको…’ सिंहाने जिराफ नर-मादीसमोर पिल्लावर केला क्रूर हल्ला; ते दोघेही फक्त पाहात राहिले… VIDEO पाहून नेटकरी हळहळले

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @say_khan78 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्यावर आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेकजण यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने लिहिलंय की, “नोरा फतेहीचा मुलगा”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “खरंच खूप सुंदर डान्स”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “सुपर हिरो”, तसेच इतर युजर्स या विद्यार्थ्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School boy stunning dance on dilbar dilbar by nora fatehi after watching the video netizens appreciated sap