Viral video: शाळकरी मुलांना घरी सोडणार्‍या आणि त्यांना शाळेत नेणार्‍या बससाठी जवळपास सर्व देशांमध्ये स्वतंत्र कायदे आहेत. ड्रायव्हरला वेगळे प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून ते योग्य प्रकारे गाडी चालवून मुलांची चांगली काळजी घेऊ शकतील. परंतु, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ड्रायव्हरच्या चुकीमुळे एक चिमुलका मृत्यूच्या दारात सापडला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. तर इथून पुढे आपल्या मुलांना स्कूलबसमधून पाठवणे किती सुरक्षीत आहे, असा प्रश्न तुम्हाला पडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

@crazyclipsonly ट्विटर अकाऊंटने शेअर केलेला हा व्हिडिओ आठ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी स्कूल बसमधून खाली उतरताना दिसत आहे. मात्र, बस चालवणाऱ्या महिलेचे मुलाकडे लक्ष नव्हते. मूल खाली उतरण्यापूर्वीच चालकाने गेट बंद केले, त्यात मुलाची बॅग अडकली आणि बॅगेसोबत मुलगाही. मात्र मुलगा बसच्या दरवाजात अडकला असल्याचे ड्रायव्हर महिलेच्या अजिबात लक्षात आले नाही. त्यामुळे तिने बस सुरु केली, मात्र दरवाजात अडकलेला मुलगा तसाच बससोबत फरफटत होता. यावेळी बसबाहेर लटकलेल्या मुलाला कित्येक किलोमिटर तसंच फरफटत नेले. बऱ्याच वेळानंतर चालकाची नजर बसच्या गेटवर लटकलेल्या मुलावर पडते आणि ती बस थांबवते, चिमुकल्याला पाहिल्यानंतर त्याच्या शरिरावरही अनेक जखमा झाल्याचं कळतं त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात हलवलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: संघर्ष कुणाला चुकलाय? ९५ वर्षीय आजोबा जगण्यासाठी या वयातही करत आहेत ‘हे’ काम

हा व्हिडीओ २०१५ मधला असून आता तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत. @jcarr1221 वापरकर्त्याने लिहिले की, मी हा व्हिडिओ पाहत असताना माझा श्वास रोखून धरला होता.