सुपरस्टार रजनीकांतचा नवा चित्रपट ‘जेलर’ १० ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. त्याआधीच चित्रपटातील एक गाणं अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतेय. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर ज्याच्या अनेक रिल्स ट्रेंडमध्ये आहेत. हे गाणं म्हणजे ‘नु कावला’. त्यावर अभिनेत्री तमन्ना भाटीयाने जबरदस्त डान्स केला आहे. या डान्सची कॉपी करण्यात आता मोठ्यांसह लहान मुलंही मागे नाहीत. अशाचप्रकारे एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात काही शाळकरी विद्यार्थी मज्जा मस्ती करत ‘नु कावला’ गाण्यावर ढासू डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर विद्यार्थ्यांनी जो काही डान्स केलाय तो पाहून खुद्द तमन्ना भाटीया सुद्धा फिदा होईल.
‘नु कावला’ गाण्यावर विद्यार्थ्यांचा ढासू डान्स
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका शाळेच्या मैदानात काही शाळकरी विद्यार्थ्यांचा ग्रुप ‘नु कावला’ या गाण्यावर नाचत आहेत. निळ्या रंगाचा शर्ट आणि तपकिरी रंगाची पँट अशा शालेय गणवेशात हे सर्व विद्यार्थी दिसत आहेत. यावेळी हे सगळे मिळून ‘नु कावला’ या गाण्यावर नाचू लागतात. विशेष म्हणजे या ग्रुपमधील एक गोंडस मुलगा अगदी एनर्जीने प्रत्येक डान्स स्टेप परफेक्ट करताना दिसतोय. यानंतर त्याच्या डान्सच्या स्टेप्स पाहून इतर विद्यार्थी त्या हुबेहुब कॉपी करत आहेत. या विद्यार्थ्यांचा उत्साह आणि त्यांच्या डान्स स्टेप्स पाहून खरंच तुम्ही सुद्धा थक्कच व्हाल. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. विद्यार्थ्यांचा हा डान्स खुद्द रजनीकांतलाही आवडेल असा आहे.
विद्यार्थ्यांनी तर तमन्ना भाटीयाला सुद्धा दिली टक्कर
हा व्हिडीओ (@balramrj143) नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट करण्यात आली आहे. पाच दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच युजर्स त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या विद्यार्थ्यांच्या डान्सचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. काही जणांच्या मते या विद्यार्थ्यांनी तर तमन्ना भाटीयाला सुद्धा टक्कर दिली. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील सांगा खरंच हे शाळकरी विद्यार्थी तमन्ना भाटीया पेक्षाही भारी डान्स करतायत का?
‘जेलर’ हा चित्रपट 10 ऑगस्टला रिलीज होणार आहे. नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित आणि अनिरुद्ध रविचंदर यांचे संगीत असलेला हा तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधील ‘नु कावला’ हे गाणं आता लोकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं आहे.