School kids accident: सोशल मीडियावर अनेकदा रस्ते अपघातांचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात आणि अशा अपघातात कसलीच चूक नसताना लहान मुलांना दुखापत झाली तर काळजात धडकी भरते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एका वाहनचालकाच्या चुकीमुळे शाळेतल्या चिमुकल्यांचा जीव धोक्यात आला. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर या व्हिडीओची सध्या चर्चा सुरू आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शाळेतली लहान लहान मुलं एका व्हॅनमध्ये बसलेली दिसतायत. या व्हॅनच्या मागच्या बाजूला एक महिला त्या मुलांना व्हॅनमध्ये बसवताना दिसतेय आणि यादरम्यान व्हॅनच्या मागच्या बाजूचा दरवाजा उघडाच असतो. पण, अचानक व्हॅन सुरू होते आणि भरवेगात असलेली व्हॅन एका ठिकाणी आदळते. आदळल्यानंतर मागे बसलेल्या मुलांपैकी दोन मुलं खाली पडतात. त्यातली एक मुलगी खाली पडते आणि एक मुलगा तर टायरच्या खालीच येतो. ही घटना पाहून आजूबाजूला लगेच गर्दी जमते. सगळी माणसं त्या मुलांना वाचवायला पुढे येतात. टायरमध्ये अडकलेल्या मुलाला आधी ते सुरक्षितपणे बाहेर काढतात आणि मुलीला उचलतात.
चिमुकल्यांचा हा व्हिडीओ @heart_touchinghub या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “माणुसकी अजूनही जिवंत आहे” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तसंच याला तब्बल एक मिलियन व्ह्यूज आले आहेत.
हेही वाचा… काकी जरा दमानं! चालत्या ट्रेनला लटकली महिला, पुढे जे घडलं ते भयंकर, VIDEO पाहून कपाळावर माराल हात
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, त्या माणसांचे खूप आभार, ज्यांनी मुलांचा जीव वाचवला; तर दुसऱ्याने “ड्रायव्हरने गाडी पार्क न करता अशीच सोडून दिली वाटतं.” तर एक जण कमेंट करत म्हणाला, “देवाचीच कृपा म्हणायची की कोणालाच लागलं नाही.”