Pakistani School Dangerous Condition: ज्या देशात ३५०० कोटी रुपयांचा जगातील सर्वात उंच पुतळा बसवला आहे, तिथल्या शाळांची ही स्थिती पाहा, तुम्ही खरं सांगायला का घाबरताय? असे म्हणत एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे लाइटहाऊस जर्नालिज्मला लक्षात आले. भारताचे पंतप्रधान ८००० कोटींच्या विमानातून जग फिरतात विश्वगुरू पण म्हणून गर्वाने गौरवले जातात पण याच देशात शाळकरी मुले चिखलात बसल्याचे दिसून येत आहे. हा फोटो भारतातील अत्यंत दयनीय शाळांची स्थिती दर्शवतो, असा दावा या व्हायरल फोटोंवरून केला जात आहे. विशेष म्हणजे हाच फोटो व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आज आपण या फोटोमागील खरी गोष्ट जाणून घेणार आहोत.
काय होत आहे व्हायरल?
X यूजर, anwar ali ने व्हायरल चित्र आपल्या प्रोफाइल वर शेअर केले.
इतर वापरकर्ते देखील अशाच दाव्यांसह व्हायरल फोटो शेअर करत आहेत.
तपास:
गुगल लेन्सद्वारे आम्ही या फोटोवर एक साधा रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही आमचा तपास सुरू केला. आम्हाला २३ मार्च २०१६ चे एक ट्विट सापडला. अब्दुल कय्युम सिद्दीकी यांनी तो फोटो शेअर केला होता आणि त्याला कॅप्शन देऊन सांगितले होते की, ‘शुजाबाद जिल्हा मुलतान येथील एका शाळेचे’ हे दृश्य आहे.
आणखी एका X वापरकर्त्याने २०१७ मध्ये हा फोटो पोस्ट केला होता.
कॅप्शन मध्ये लिहिल्याप्रमाणे हा फोटो पाकिस्तानमधील आहे हे स्पष्ट होतेय. आम्हाला २०१५ सालातील एक पोस्ट देखील सापडली.
यावरून लक्षात येते की हा फोटो 9 वर्षे जुना आहे. आम्ही नंतर टाइम फिल्टर लागू करण्यासाठी आणि पुढील शोध घेण्यासाठी जुन्या गूगल इमेज लेआउटचा वापर केला. यामुळे आम्हाला siasat.pk या वेबसाइटवर असलेला हाच फोटो सापडला.
‘तल्हाखान’ यांनी हा फोटो १० जून २०१५ रोजी पोस्ट केला होता.
मजकुरात नमूद केले आहे की, फोटो पाकिस्तानातील पंजाबमधील शाळांची वाईट स्थिती दर्शवतो.
हे ही वाचा << ३७ भारतीय सैनिकांना जिवंत जाळल्याचा भीषण दावा व्हायरल; मूळ वास्तवही भयंकर, पाहा Video ची खरी बाजू
निष्कर्ष: भारतातील शाळांची खराब स्थिती दर्शविण्याचा दावा केलेला व्हायरल फोटो प्रत्यक्षात २०१५ मधील पाकिस्तानच्या पंजाब भागातील एका शाळेतील आहे.