लहान मुलांना सांभाळणं काही सोपं काम नाही. ही मुलं कधी काय करतील, कधी काय बोलतील सांगाता येत नाही. त्यातच जर या मुलांचा अभ्यास घ्यायचा म्हणजे आईसाठी तर तारेवरची कसरतच असते. त्यांच्या चित्रविचित्र प्रश्नांची उत्तरं देत अभ्यास घ्यावा लागतो. अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षिकेला लाडीगोडी लावणाऱ्या एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता याच्या अगदी उलट शिक्षिकेला धमकी देणाऱ्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. छोट्याशा चिमुकल्याने शाळेत शिक्षिकेलाच धमकी दिली आहे. अशीतशी धमकी नाही. ही धमकी ऐकून तर तुम्हीही हैराण व्हाल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
व्हिडीओत पाहू शकता एक मुलगा शाळेत आहे. तो रडताना दिसतो आहे. त्याच्यासमोर त्याची शिक्षिका आहे, जी या व्हिडीओत दिसत नाही पण तिचा आवाज ऐकू येतो आहे. शिक्षिका या मुलाला ओरडली म्हणून तो तिच्यावर रागावला आहे. त्याने त्याचा राग फक्त रडून नाही तर बोलूनही व्यक्त केला आहे. या व्हिडीओमध्ये या चिमुकल्यानं थेट त्याच्या शिक्षिकेलाच धमकी दिली आहे. मग लावा माझ्या बापाला फोन अशी धमकी शिक्षिकेला दिलीय. तसंच मला मारु नका, माझा बाप मला खूप छळतोय असंही म्हणत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – लग्नात मेहुणीनं नवरदेवासोबत केलं असं काही की; Video पाहून म्हणाल, अशी मेहुणी नको रे बाबा
शाळेत न जाण्यासाठी हट्ट धरलेल्या मुलांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील पहायला मिळतात. या व्हिडिओंमधील लहान मुलांचा निरागसपणा आणि खोडकरपणा बघून अनेकांना हसू आवरत नाही.