Girlfriend Caught Boyfriend: गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा पती-पत्नीने एकमेकांसोबत दगा केलेल्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. दरम्यान अशाच एका शाळकरी मुलीनं आपल्या बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडण्याचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे.हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ हे फक्त मनोरंजनासाठी बनवले जातात. तर काही व्हिडीओ हे एकदम खरे असतात. जे पाहून थक्क व्हायला होतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो अगदी खरा असल्याचं म्हटलं जातंय. हा व्हिडीओ एका बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचा असून सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेली अनेक जोडपी तुम्ही पाहिली असतील. प्रेमाला वय नसतं मात्र आज-कालची पिढी अगदी शाळेत असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडते. मात्र ते नातं पुढंपर्यंत टिकवण्यात मात्र यशस्वी होत नाहीत.
सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अरुणाचल प्रदेशचा असल्याचं बोललं जातंय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुणी तिच्या बॉफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत पकडते आणि त्याच्यावर ओरडायला लागते. यावर तो तरुण तिच्यावरच हात उचलतो. एवढंच नाहीतर तिला ढकलूनही देतो. त्यानंतर तरुणी रस्त्यावर पडते. यावेळी इतर तरुण त्या मुलाला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र तरुण तरीही त्या तरुणीच्या अंगावर धावून जात आहे. त्याचवेळी बाजूच्या कुणीतरी ही घटना आपल्या फोनमध्ये रिकॉर्ड करत आहे. यांच्या भांडणाचा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर धुमाकूळ घालक आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> तुम्हीही मनालीला जायचा प्लॅन करताय? थांबा…आधी हा VIDEO पाहा; धडकी भरवणारे ७ सेकंद अन्…
हा व्हिडीओ @gharkekalesh या नावाच्या अकाउंट वरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकजणांनी यावर भरभरून कंमेंट केल्या आहेत.