Viral Video : शाळेला प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेचे दिवस कधीही परत येत नाही पण शाळेच्या आठवणी कायम आपल्याबरोबर राहतात.या आठवणी काय आपल्या मनात जीवंत असतात. सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून अनेकदा शाळेचे दिवस, मित्र मैत्रीणी, शिक्षक पुन्हा आठवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या शाळेची आठवण येऊ शकते.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हालाा शाळा दिसेल. शाळेच्या मैदानावर असंख्य विद्यार्थी खाली बसून व्यायाम करताना दिसत आहे. त्यांनी शाळेचा गणवेश परिधान केला आहे. तुम्हीही तुमच्या शाळेच्या दिवसांमध्ये हे व्यायाम केले असावेत. व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस नक्कीच आठवतील. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “शाळेच्या आठवणी – शाळेच्या आठवणी कठीण दिवसात आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात”
murharigiri या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर एका तरुणाने सुंदर मनोगत व्यक्त केले आहे. त्याचे मनोगत ऐकून तुम्हीही भावूक व्हाल. हा तरुण म्हणतो, “सर्व गोष्टी परत येऊ शकतात. पण ही वेळ वापस न येणार, हे वय वापस न येणार आणि या या आठवणी परत न येतील आणि आपण लोक तरसू या गोष्टींसाठी…”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी आता” तर एका युजरने लिहिलेय, “मी तर खूप भाग्यवान समजतो स्वत:ला कारण मी एक शिक्षक आहे आणि या सर्व गोष्टी ३३ वर्षानंतरही मी मुलाबरोबर अनुभवतोय त्याच्याबरोबर आजही लहान होऊन खेळतोय.” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरं आहे मित्रा. त्यावेळी शाळा नको वाटायचं पण आता कळतंय की ते दिवस म्हणजे आयुष्यातील सगळ्यात भारी दिवस होते आणि ते परत नाही येणार कधीही”