Viral Video : शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. शाळेचे दिवस, शाळेतील शिक्षक, वर्गखोल्या, वर्गमित्र-मैत्रिणी कायम लक्षात राहतात. असं म्हणतात, शाळेचे दिवस पुन्हा कधीही परत येत नाही. फक्त मागे शाळेच्या आठवणी उरतात. सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून शाळेच्या आठवणी ताज्या होतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करताना दिसेल. व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमच्या शाळेची आठवण येईल.
तुम्ही कधी शाळेतील खिचडी खाल्ली आहे का? हो, शाळेतील खिचडी. जेवणाच्या ब्रेक मध्ये प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी वाटप केले जाते. तुम्ही शाळेतील खिचडीचा कधी आस्वाद घेतला आहे का? जर हो तर हा व्हिडिओ नक्की पाहा.
हा व्हायरल व्हिडिओ एका शाळेतील आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करताना दिसत आहे. विद्यार्थी सुध्दा आवडीने प्लेटमध्ये खिचडी घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस आणि शाळेतल्या खिचडीची चव नक्की आठवेन.
पाहा व्हायरल व्हिडिओ (Video Viral)
self_love_96k_maratha या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मी दहावीत असताना खूप मजा केली. तुम्ही..?”
या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “त्या खिचडीची चव कोणत्याही फाइव्ह स्टार हॉटेल मध्ये मिळू शकत नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “शाळेच्या आठवणी कायम आपल्या सोबत राहतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, ” ८वी ते १० शाळा भरायची १० वाजता आणि आम्ही जायचो ८ वाजता, दररोज सकाळी २ तास मित्रांबरोबर खेळायचो. ते दिवस आयुष्यात कधीच येणार नाही आता. मी कधीही दुपारचा डबा नेला नाही. daily मित्रांबरोबर दुपारच्या सुट्टीत खिचडी मिळायची ती खायची आणि उरलेल्या वेळात क्रिकेट खेळायचो, न अभ्यासाची चिंता, न भविष्याचे टेन्शन, कसलंच काही देणंघेणं नव्हतं.. फक्त मनसोक्त आयुष्य जगायचं बस्स एवढंच होत तेव्हा…. खरंच ते दिवस आयुष्यात आता पुन्हा येणे नाही” एक युजर लिहितो, “सरकारने खिचंडी बंद नका करु आणखी चांगले तांदुळ शाळेत पाठवावे”