School Friendship Emotional Video : ‘दु:ख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा’, ही अनंत राऊत यांनी लिहिलेली कविता तुम्ही ऐकली असेल, जी तुम्हीही कधी तरी तुमच्या आयुष्याशी रिलेट करून पाहिली असेल, कारण आयुष्यात काही मित्र-मैत्रिणी अशा असतात ना ज्यांना आपण कधीच विसरू शकत नाही; जे सुखात नाही पण दु:खात नेहमी मदतीला धावून येतात. विशेषत: शाळेतील मैत्रीचे नाते हे अविस्मरणीय असते. हे नातं रक्ताचं नसलं तरी आपण ते आपलं मानलेलं असतं. अशाच शाळेतील निरागस मैत्रीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात अपंग विद्यार्थ्याला त्याचे मित्र करत असलेली मदत पाहून तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

आज तुमच्या मोबाइलमध्ये शेकडो मित्र-मैत्रिणींचे नंबर सेव्ह असतील, सोशल मीडियावरही असंख्य मित्र असतील, पण यातील तुमच्या अडचणीच्या वेळी कोण धावून येईल असे विचारले तर तुम्ही काही मोजकीच नाव घ्याल. कारण तुम्हाला या मोजक्या मित्रांवर विश्वास असतो की, काही झालं तरी हेच आपल्याला मदत करतील. अशाच शाळेतील तीन मित्रांचा भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
Video Viral
“आयुष्यात कितीही मोठे व्हा पण वडिलांचे कष्ट कधी विसरू नका” बाप लेकीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

निरागस मैत्रीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे येतील भरुन (Friendship Emotional Video)

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका शाळेत मधल्या सुट्टीची वेळ आहे. त्यामुळे वर्गाबाहेर काही विद्यार्थी आनंदाने खेळत, थट्टा मस्करी करत आहेत. पण, खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अगदी बाजूला दोन विद्यार्थी असे आहेत जे आपल्या अपंग मित्राला मदत करतायत. एक अपंग मित्राची व्हीलचेअर पकडून त्याला वर्गाबाहेर घेऊन आला, तर दुसऱ्याने त्याचे जेवणाचे ताट धुवून मग स्वत:च्या हातात पाणी घेऊन त्याचा चेहरा स्वच्छ केला. यानंतर दोघेही पुन्हा त्याला वर्गात घेऊन गेले. इतकी निरागस आणि निखळ मैत्री फक्त तुम्हाला शाळेतच पाहायला मिळते. हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे भरून आले असतील.

शाळेत काही मित्र असे असतात, जे मित्रांमधील कमकुवतता शोधत त्याला हिणवतात, अपमानस्पद बोलतात, मित्रांच्या ग्रुपमध्ये त्याची थट्टा मस्करी करतात. पण, या व्हिडीओत मैत्री म्हणजे नेमकं काय याची खरी प्रचिती येईल. निखळ, निरागस मैत्री कशी असावी हे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही समजेल.

हेही वाचा – “दु:ख ही प्रेमाची किंमत, अलविदा…”; टाटांच्या निधनानंतर त्यांच्या ३० वर्षीय मित्राची भावनिक POST

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात असून अनेकांनी त्यावर आपल्या भावनिक कमेंट केल्या आहेत. एका युजरने म्हटलेय की, हीच खरी मैत्री आहे; असा एक तरी सच्चा मित्र आयुष्यात असतो. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, कटर, साथीदार, भाऊ, खरंच, सलाम तुमच्या मैत्रीला. तिसऱ्या युजरने लिहिले की, आयुष्यातील नात्यांमधील अनमोल असा ठेवा मैत्री. चौथ्या युजरने लिहिलेय की, आपलं बालपण सुद्धा अश्याच मैत्रीत गेलेलं असतं. १९९०-२००० च्या बॅचलाच माहीती ती मज्जा काय होती. अशाप्रकारे युजर्स हार्ट इमोजीसह या निरागस मैत्रीच्या व्हिडीओवर आपलं प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच अनेकजण आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा देत आहेत.