वडील आणि मुलीचं नातं अतिशय अनोखं असतं. या दोघांमध्ये एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. वडील आपल्या मुलीच्या आनंदासाठी काहीही करू शकतात. मुलीही आपल्या आयुष्यात वडिलांच्या इच्छेला आणि त्यांच्या आनंदाला सर्वाधिक प्राधान्य देतात. सध्या सोशल मीडियावर वडील आणि मुलीच्या नात्याचे सौंदर्य दाखवणारा अतिशय सुंदर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर आपल्याही चेहऱ्यावर हसू उमटेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी डोळे बंद करून उभी आहे. यानंतर तिचे बाबा तिला स्वीगीचे टीशर्ट दाखवतात. यावरून असे लक्षात येते की या व्यक्तीला स्वीगीमध्ये नवीन नोकरी मिळाली आहे. हे पाहताच मुलीचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ती आनंदाने उड्या मारू लागते.

मुलगी आनंदाने आपल्या बाबांना मिठी मारते. हे दोघेही यावेळी खूपच खुश दिसत आहेत. सोशल मीडियावरही नेटकरी या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. तसेच, वडील-मुलीच्या नात्यातील हा गोडवा पाहून सर्वच भावुक झाले आहेत. अनेकजण हा व्हिडीओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअरही करत आहेत.