कर्नाटकात घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. एका मुख्याध्यापकाने शाळेतील हॉस्टेलमध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कर्नाटकच्या श्रीरंगपटना येथील कटेरी सरकारी शाळेत घडलीय. मांड्या जिल्ह्यातील पांडवपुरा तालुक्यातील कटेरी गावात असलेल्या शाळेत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप मुख्याध्यापक चिन्मयानंदवर करण्यात आला आहे. हे गंभीर प्रकरण उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांनी मिळून मुख्याध्यापकाला लाठ्या-काठ्यांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं.
नेमकं काय घडलं?
कटेरी गावातील शाळेत एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी या मुख्याध्यापकाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. विद्यार्थ्यांनी झाडू आणि काठ्यांनी मुख्याध्यापकाची धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलींसोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप मुख्याध्यापक चिन्मयानंद याच्यावर करण्यात आले आहेत. या गंभीर प्रकरणाबाबत विद्यार्थ्यांना समजल्यानंतर मुख्याध्यापकाला विद्यार्थ्यांच्या ग्रुपने चोप दिला.
इथे पाहा व्हिडीओ
मुख्याध्यापकावर गंभीर आरोप
मुख्याध्यापकाने त्याच्या रुममध्ये बोलावलं आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणाबाबत कुणालाही सांगितलं, तर त्या विद्यार्थ्यांच्या ट्रान्सफर सर्टिफिकेटमध्ये त्यांची प्रतिमा मलीन करण्यात येईल, अशी धमकी मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना दिली होती. मुख्याध्यापक मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवायचा, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. हे गंभीर प्रकरण उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकाला लाठ्या काठ्यांनी कुटला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.