आपले विचार हे आपले भवितव्य आणि आपले व्यक्तिमत्व घडवतात. त्यामुळे पालक आणि शिक्षक नेहमी आपल्या पाल्यावर आणि विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करतात. चांगल्या विचार त्यांच्या मनावर बिंबवतात. बालमनावर रूजलेले विचार कायम लक्षात राहतात. लहानपणी मुलांमधील सर्जनशीलता वाढवण्याचा प्रयत्न शिक्षक नेहमी करतात. लहानपणी शाळेत तुम्ही अनेकदा निबंध लिहिले असतील? हो ना…माझी शाळा, माझी आई, माझा आवडता खेळ. हे अगदी साधे विषय असतात जे तुमच्या आवडी निवडी, तुमच्या आवडत्या व्यक्ती किंवा ठिकाण याबाबत तुम्हाला काय वाटते हे व्यक्त करणारे हे विषय पण काही विषय अत्यंत मजेशीर असतात जे तुमच्या कल्पनाशक्तीवर जोर द्यायला भाग पाडतात जसे की, जर शाळा बंद पडली तर, जर पाऊस पडलाच नाही तर , जर सूर्य उगवलाच नाही तर…. असे विषय विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलता वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात. सध्या अशाच एका विषयावर एका चिमुकल्याने निबंध लिहिला आहे ज्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. निंबध वाचून तुम्ही पोट धरून हसाल. नेटकऱ्यांना देखील हा निंबध खूप आवडला आहे.

व्हायरल फोटामध्ये माणसांना पंख असते तर या विषयावर निबंध लिहिला आहे. खरं तर या निबंधामध्ये माणसाला जर पक्ष्यांसारखे पंख असते तर अशी कल्पना करून निबंध लिहिणे अपेक्षित होते पण चिमुकल्याने मात्र वेगळ्याच दृष्टिकोनातून हा विषय मांडला आहे.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
Gautam Rode Pankhuri Awasthy break up thoughts
सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”
Puneri pati viral for parking in his spot funny puneri pati goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे; शेवटचं बक्षिस वाचून पोट धरुन हसाल
a man helped women to cross the road | Viral Video
माणसं ओळखायला आपण चुकतो! ज्याला जग वेडा समजत होते तोच खरा शहाणा निघाला; VIDEO एकदा पाहाच
Puneri Pati
“उगाच पुण्याच्या पाट्या जगभर प्रसिद्ध नाहीत!” नो पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेरी शैलीत टोला, पाहा पुणेरी पाटी

माणसांना पंख असते तर माणूस हवेत उडू शकला असता. पण या चिमुकल्याने माणसे उडतात याचा वेगळाच अर्थ लावून निंबध लिहिलेला आहे जो वाचून नेटकऱ्यांना त्याचं हसू आवरणे अशक्य होत आहे.

चिमुकल्याचा निंबध

माणसांना पंख असते तर…!
आजकाल आपण समाजात बघतो की, माणसांना पंख नसताना देखील ते दुसऱ्यांवर उडतात. माणसांना जर खरोखर पंख असते तर ते दुसऱ्यांवर जास्त उडाले असते. आशा आहे की समाजातील हे कटु सत्या मी या निंबधतात लिहिल्यामुळे सर तुम्ही माझ्यावर उडणार नाही.”

या निंबधात चिमुकल्याने उडतात हा शब्दप्रयोग माणसं एकमेकांवर चिडतात हे सांगण्यासाठी केला आहे. जर सतत एकमेकांवर चिडणाऱ्या या माणसांना खरचं पख असते तर त्यांनी काय केले असते हे सांगण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. चिमुकल्याचा हटके विचार सरांना कदाचित आवडला असावा त्यामुळे त्याला १० पैकी १० गुण दिल्याचे लाल शाईने लिहिलेले दिसत आहे.

हेही वाचा – केरळमध्ये स्वातंत्र्यदिन सोहळ्यादरम्यान खरचं पक्ष्याने तिरंगा फडकवला का? नक्की काय घडले, जाणून घ्या Viral Videoचे सत्य

हा निंबध वाचून नेटकरी मात्र खळखळून हसत आहे. हा फोटो pcmc_kar’s आणि kothrudkarpune’s नावाच्या पेजवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना “या निबंधाला तुम्ही किती मार्क्स द्याल? “असा प्रश्नही विचारला आहे. ज्याचे उत्तर देताना नेटकऱ्यांनी लिहिले की, “सुंदर हस्ताक्षरासाठी १० मार्क जास्तीचे द्या”

अनेकांनी चिमुकल्याच्या मताशी सहमती दर्शवली तर काहींनी हा चिमुकला ‘पुणेरी कारटा’ आहे असे म्हटले.

तुम्हाला चिमुकल्याचा निंबध कसा वाटला?