आपले विचार हे आपले भवितव्य आणि आपले व्यक्तिमत्व घडवतात. त्यामुळे पालक आणि शिक्षक नेहमी आपल्या पाल्यावर आणि विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करतात. चांगल्या विचार त्यांच्या मनावर बिंबवतात. बालमनावर रूजलेले विचार कायम लक्षात राहतात. लहानपणी मुलांमधील सर्जनशीलता वाढवण्याचा प्रयत्न शिक्षक नेहमी करतात. लहानपणी शाळेत तुम्ही अनेकदा निबंध लिहिले असतील? हो ना…माझी शाळा, माझी आई, माझा आवडता खेळ. हे अगदी साधे विषय असतात जे तुमच्या आवडी निवडी, तुमच्या आवडत्या व्यक्ती किंवा ठिकाण याबाबत तुम्हाला काय वाटते हे व्यक्त करणारे हे विषय पण काही विषय अत्यंत मजेशीर असतात जे तुमच्या कल्पनाशक्तीवर जोर द्यायला भाग पाडतात जसे की, जर शाळा बंद पडली तर, जर पाऊस पडलाच नाही तर , जर सूर्य उगवलाच नाही तर…. असे विषय विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलता वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात. सध्या अशाच एका विषयावर एका चिमुकल्याने निबंध लिहिला आहे ज्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. निंबध वाचून तुम्ही पोट धरून हसाल. नेटकऱ्यांना देखील हा निंबध खूप आवडला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा