गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एका शाळेच्या फी स्ट्रक्चरची माहिती देणारा फोटो व्हायरल होत आहे. आपल्या मुलांसाठी शाळेत भरावी लागणारी भरमसाठ फी हा सध्या घराघरात चर्चेचा विषय ठरला आहे. अगदी शिशुगट असो किंवा पहिली-दुसरी, लाखो रुपयांची फी भरावी लागत असल्यामुळे घराघरात आर्थिक गणित जुळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशाच एका शाळेच्या फी रचनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यातील तपशील पाहून नेटिझन्सकडून नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

८४०० रुपयांची ‘पॅरेंटल ओरिएंटेशन फी’!

सोशल मीडियावर नर्सरी शाळेच्या फी रचनेचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शाळेकडून नर्सरीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून आकारण्यात येणारी फी देण्यात आली आहे. फीमध्ये कोणत्या बाबीसाठी किती पैसे आकारण्यात आले आहेत, त्याचीही माहिती आहे. नर्सरीला प्रवेश घेणाऱ्या एका विद्यार्थ्यासाठी पालकांना शाळेला ५५ हजार ६०० रुपये अदा करावे लागतील, असं या फोटोवरून दिसत आहे. पण त्यातच ‘पॅरेंटल ओरिएंटेशन फी’ या नावाखाली ८ हजार ४०० रुपये आकारण्यात आले आहेत. जगदीश चतुर्वेदी या व्यक्तीने हा फोटो शेअर करताना त्यावर खोचक पोस्ट केली आहे.

desi Jugaad Jugadu Punekar Kaka's Video Viral
‘छत्री-रेनकोट विसरले म्हणून काय झालं आपल्याकडे जुगाड आहे ना!’, जुगाडू पुणेकर काकांचा Video Viral
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
viscose fabric
विश्लेषण: ‘विस्कोस’ कापड खरेच पर्यावरणपूरक असते का? पर्यावरणवाद्यांकडून वेगळेच निष्कर्ष?
Emotional video : when middle class boy go to the jnv hostel by leaving home
जेव्हा मध्यमवर्गीय घरातील मुलगा घर सोडून JNV च्या होस्टेलवर राहायला जातो; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
Indian education system
पुन्हा अविद्येकडे नेणारे षड्यंत्र?
"Black Or White, Virgin Or Not": Bengaluru Auto's Gender Equality bengaluru auto driver written a message on back side of his auto goes viral
“महिला ही व्हर्जीन…” रिक्षा चालकानं रिक्षाच्या मागे लिहला विचित्र मेसेज; PHOTO पाहून तुम्हीच सांगा तुम्हाला हे पटलं का?
Apple Sheera Recipe | how to make Apple Sheera
Apple Sheera Recipe : सफरचंदाचा शिरा! रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहा Video
Student told Hilarious Math Full Form funny Answer
MATHS चा फुल फॉर्म माहितेय? विद्यार्थ्याने दिले भन्नाट उत्तर, पाहा Viral Video

“८४०० रुपये पॅरेंट ओरिएंटेशन फी! एकही पालक या रकमेच्या २० टक्के रक्कमही डॉक्टरच्या सल्ल्यासाठी द्यायला तयार होणार नाही”, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. तसेच पुढे “मी आता एक शाळा उघडण्याचा विचार करत आहे”, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी पोस्टमध्ये केली आहे.

काय आहे फोटोमध्ये?

या फोटोममध्ये २०२४-२४ सालासाठीची नर्सरीची फी देण्यात आली आहे. त्यानुसार प्रवेश शुल्क ५५ हजार ६३८, कॉशन फी (परत मिळण्याजोगी) ३० हजार ०१९, वार्षिक मूल्य २८ हजार ३१४, डेव्हलपमेंट फी १३ हजार ९४८, ट्युशन फी २३ हजार ७३७ रुपये अशा इतर प्रकारच्या मूल्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या सगळ्यांची बेरीज मिळून एकूण १ लाख ५१ हजार ६५६ रुपये पालकांना आपल्या एका पाल्याच्या प्रवेशावेळी भरावे लागणार आहेत. एवढी भरमसाठ फी पाहून नेटिझन्समध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

PHOTO: असा बॉस कुणाला मिळू नये! कर्मचाऱ्याचा अपघात; बॉस विचारतो “ऑफिसला कधी येशील ते सांग” चॅट वाचून सांगा चूक कुणाची

या पोस्टवर डॉ. विनीत गोविंदा गुप्ता नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. त्यात “लोक त्यांच्या मुलांसाठी अशा गोष्टींवर इतका खर्च करतील जेवढा ते स्वत:साठी कधीही करणार नाहीत. त्यामुळेच महागडे क्लास, शाळा, माहाविद्यालये यांची दरवाढ दिवसेंदिवस भरमसाठ पद्धतीने वाढत आहे”, असं म्हटलं आहे.

एका व्यक्तीने आणखी एका शाळेच्या फीचा तपशील पोस्ट केला आहे. त्यात एकूण फी तब्बल ३ लाख ४९ हजार ७०० रुपयांच्या घरात असल्याचं दिसत आहे. शिवाय ही फी आकारणारी शाळा काही टॉपच्या मानल्या जाणाऱ्या शाळांपैकीही नसल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.