School Boy Dance: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी जीवाशी खेळून लोकं अशाप्रकारचे व्हिडीओ करत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आजकाल शाळेतील, कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या डान्सचे व्हिडीओदेखील तुफान व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, ज्यात एक विद्यार्थी शाळेतील एका कार्यक्रमात नोरा फतेहीच्या गाण्यावर थिरकताना दिसतोय.

हेही वाचा… भांडी घासण्याची ही कोणती पद्धत? महिलेचा जुगाडू VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “या काकींना…”

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकता की एका शाळेत कार्यक्रम सुरू आहे. स्टेजवर काही शिक्षकदेखील बसले आहेत आणि त्यांच्या पुढ्यातच एक विद्यार्थी डान्स करताना दिसत आहे.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसमोर हा मुलगा युनिफॉर्मवर एका बॉलीवूड गाण्यावर डान्स करत आहे. अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीच्या ‘दिलबर दिलबर’ या गाण्यावर या विद्यार्थ्याने ठेका धरला आहे. अगदी हुबेहुब डान्स करत विद्यार्थ्याने आपलं नृत्य कौशल्य सादर केलं आहे.

विद्यार्थ्याचा स्टेजवर डान्स सुरू असताना अनेकजण त्याचा व्हिडीओदेखील रेकॉर्ड करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ @say_khan78 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तीन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला आहे. तर या व्हिडीओला तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त व्हयूज आले आहेत.

हेही वाचा… Shopping Trending Topics: शॉपिंग करायचीय, पण ट्रेंडच माहित नाही! गेल्या सात दिवसांत ‘या’ गोष्टी होतायत गुगल ट्रेंडवर सर्च, पाहा यादी

युजर्सच्या प्रतिक्रिया

शाळेतील विद्यार्थ्याचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया कमेंट करत शेअर केल्या आहेत. एका नेटकऱ्याने व्हिडीओला कमेंट करत लिहिलं, “मागे बसलेल्या मॅडमचं हसणं थांबतंच नाही आहे”. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “नोरा पण तुला पाहून लाजेल.” तर अनेकांनी त्याच्या डान्सची खिल्ली उडवली. पण यावेळी अनेकांनी या विद्यार्थ्याला सपोर्टदेखील केला.

सकारात्मक कमेंट करत एकजण म्हणाला, “जर हाच डान्स कोणत्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये या मुलाने केला असता, तर परिक्षकांनी टाळ्यांचा वर्षाव नक्कीच केला असता.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “या मुलाला किती चांगल्या प्रकारे डान्स करता येतो. त्याचं भविष्य खरंच उज्ज्वल आहे.”