Viral video: सोशल मीडियावर दररोज अनेक मनोरंजक आणि मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे लोकांना खूप आवडतात आणि लोक त्यावर खूप कमेंट देखील करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या कार्यक्रमात चिमुकल्या मुलांनी भन्नाट डान्स केला आहे. शाळेतील एका कार्यक्रमात दोन चिमुकल्यांनी जोडीने अप्रतिम डान्स केला आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांच्या लहानपणीचे दिवस आठवतील.

जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील शिक्षकही वेगळी वाट निवडत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आणि शाळेची गोडी निर्माण करतात.त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. कधी शिक्षक विद्यार्थ्यांना तालासुरात कविता शिकवताना दिसतात, तर कधी शिक्षिका मुलांसोबत डान्स करताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात विद्यार्थ्यांनी मराठी गाण्यावर भन्ना डान्स केला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ शाळेतील एका कार्यक्रमाचा आहे. शाळेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या कार्यक्रमादरम्यान शाळेतील लहान मुलं मंचावर नाचताना दिसत आहे,या लहानग्यांच्या हटके ठुमक्यांनी अनेकांचं मन जिंकलं आहे. लहान मुलांचे डान्स मूव्ह पाहून तुम्हालाही मज्जा येईल. या मुलाचा धमाल डान्स पाहून खाली उभी असलेले इतर शाळकरी मुलंही जोमाने नाचू लागतात, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टेजवर लहान मुलांच्या जोड्या आहेत. यावेळी “तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं चांदण पडलंय न मला भिजू द्या माझं काळीज लागलंय नाचु न गानं वाजू दया” या मराठमोळ्या गाण्यावर हे चिमुकले थिरकत आहेत. यावेळी मुलांनी पांढरा सदरा तर मुलींनी नऊवारी साडी नेसली आहे. या चिमुकल्यांच्या स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून तुम्हीही त्यांचं कौतुक कराल.

पाहा व्हिडीओ

शाळा म्हणजे फक्त अभ्यास नसतो. शाळेत ज्ञानबरोबर इतर कलागुणांना वाव दिला जातो. त्यामुळे शाळा असो की महाविद्यालय वार्षिक महोत्सव होत असतो. त्यातून लहान लहान विद्यार्थी आपली चमक दाखवत असतात. महाविद्यालयातील या कलागुणांमुळे पुढे अनेक कलाकार घडले आहेत. सोशल मीडियावर शाळेतील कार्यक्रमांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता सोशल मीडियावर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा भन्नाट डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ marathi._old_athavani2.0 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

Story img Loader