Viral video: शाळा….या दोन अक्षरी शब्दात किती मोठं विश्व सामावलंय, याची जाणीव खरं तर आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर होते. शाळेचे दिवस खरच खूप भारी असतात. शाळेतलं प्रेम,मित्रांसोबत केलेली मस्ती,मैदानवरचे खेळ, शाळेतला डान्स, सरांचे बोलणे,पेपरला केलेली कॉपी,तास चालू असताना केलेली बडबड,सगळ आठवत आता. शाळेचे दिवस परत येत नाहीत. शाळा सोडल्यानंतरही हीच शाळा, शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी या आयुष्यभर अनेकांच्या आठवणीत असतात. दरम्यान असाच एक जिल्हा परिषद शाळेतला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल तसेच तुम्हालाही शाळेतील दिवस आठवतील.

या जिल्हा परिषद शाळेतल्या या मुलांनी “फू बाई फू फुगडू फू नको येऊस भलत्या रंगात तू” या गाण्यावर तुफान डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टेजवर मुलं मुली जोडीने डान्स करत आहेत. यावेळी त्यांच्या स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून सर्वांनाच हसू अनावर झालं आहे. यावेळी मुलींनी साडी घातले तर मुलांनी शर्ट आणि जिन्स घातलं आहे. व्हिडीओवरुन हा शाळेतील स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या प्रत्येकाला त्याचे शाळेचे दिवस आठवतील एवढं नक्की.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
The young woman hit under the donkey's ear
पाठलाग करणाऱ्या गाढवाबरोबर तरुणीनं केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> महिलांनो तुम्हीही काचेची शेगडी वापरता का? मग किचनमध्ये ही चूक करू नका; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

शाळा… कुणाच्या आयुष्यातील स्वप्नवत काळ तर कुणासाठी खडतर प्रवास… कुणासाठी आयुष्याच्या सुंदर इमारतीची पायाभरणी तर कुणासाठी भुसभुशीत जमीन. शालेय जीवनाचा काळ खऱ्या अर्थाने आयुष्याला आकार देणारा. ते वयही तितकंच अवखळ. त्यामुळेच या वयात घडणाऱ्या गमतीजमती, आठवणीत मनात कायमच्या कोरल्या जातात. आयुष्याच्या या अद्भुत काळाचा ठेवा मनात रुतून राहतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कायम ताजे राहणारे हे क्षण पुन्हा कधीच येत नाहीत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर gautami_patil_.7 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून नेटकरी व्हिडीओ पाहून कौतुक करत आहेत. नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.