School Girls Smoking: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही लाइक्स आणि कमेंट्ससाठी अनेक लोक आपली हद्द पार करू लागले आहेत. त्यात तरुणांची आणि लहान मुला-मुलींची संख्या जास्त आहे. आताच्या पिढीतील काही मुलं जगाचं भान विसरून आपली मर्यादा ओलांडू लागले आहेत.
शिकण्याच्या वयात ही मुले-मुली चुकीच्या मार्गावर जात आहेत. सगळ्याचं भान विसरून थिल्लरपणा करू लागले आहेत. सध्या एक असाच लाजिरवाणा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये शाळेतील तीन अल्पवयीन मुली चक्क सिगारेट ओढताना दिसत आहेत.
विद्यार्थीनींनी सोडली लाज
सोशल मीडियावर व्हायरल झालेला शाळेतील विद्यार्थिनींचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, शाळेतील गणवेशात तीन मुली सिगारेट ओढताना दिसत आहेत. एकमेकांकडून सिगारेट घेत या मुली शाळा सोडून हा लाजिरवाणा प्रकार करताना दिसतायत. तसंच याचा व्हिडीओदेखील त्यांनी शूट केला आहे. सिगारेट ओढत गाणी म्हणत यांचा हा थिल्लरपणा सुरू असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतंय. व्हिडीओच्या कॅप्शननुसार ही घटना छत्तीसगड येथील बेमेतरा येथे घडली असल्याचं कळतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @bhilaitoday_cg या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “बेमेतरा: शाळकरी मुलींचा धूम्रपान करतानाचा व्हिडीओ व्हायरल. मुलांच्या निरागसतेशी छेडछाड की नवीन पिढीच्या दिशेने बदल? हा व्हिडीओ आपल्या समाजासाठी एक इशारा आहे. आपण आपल्या मुलांच्या भविष्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे,” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला सहा लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
विद्यार्थिनींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “या भविष्यात काय करणार? हेच करायला जाता का शाळेत,” तर दुसऱ्याने “पालकांच्या विश्वासाचा गैरफायदा नका घेऊ” अशी कमेंट केली; तर एक जण कमेंट करत म्हणाला, “अशा मुलींना शाळेतून काढून टाकलं पाहिजे.”