Har Har Shambhu Dance Viral Video : भगवान शकंरावरील हर हर शंभू गाणं प्रचंड लोकप्रिय झालं असून लोकांना या गाण्याचं वेड लागलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गायिका अभिलिप्सा पांडा यांनी हे गाणं गायलं असून इंटरनेवर ‘हर हर शंभू’ गाणं तुफान गाजलं आहे. गाण्याचे बोल ऐकताच अनेकांना या गाण्यावर जबरदस्त डान्स करायची आवडही निर्माण झाल्याचं व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे. एक शाळेत भर वर्गातच शिक्षिकेने हर हर शंभू गाण्यावर जबरस्त डान्स केला. शिक्षेकाचा डान्स पाहून विद्यार्थीही वर्गातच या गण्यावर नाचण्यात दंग झाले. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी छान प्रतिक्रियाही दिल्या आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत १८ लाखांहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.

हर हर शंभू गाणं सुरु होताच विद्यार्थ्यांनाही डान्स करण्याचा मोह आवरला नाही

पॉलिटिक्स सॉलिटिक्स नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘हर हर शंभू शीव महादेवा’ या गाण्यावर शिक्षिका भन्नाट डान्स करताना या व्हिडीओत दिसत आहे. शिक्षिकेचा डान्स पाहून विद्यार्थ्यांना डान्स करण्याचा मोह आवरलेला नाही. त्यांनीही भर वर्गातच जबरदस्त ठुमके लगावल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. एक शिक्षिका सुंदर साडीत विद्यार्थ्यांसोबत या गाण्यावर डान्स करताना व्हिडीओत दिसत आहे. त्यांच्या या डान्स व्हिडीओनं इंटरनेटवर लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. शिक्षिकेच्या आणि विद्यार्थ्यांच्या डान्स स्टेप्स अप्रतिम आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतरप नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

नक्की वाचा – Video: दुचाकीवरून आई-वडील खाली पडले, पण टाकीवर बसलेला लहान मुलगा अर्धा KM पर्यंत तसाच पुढे जातो अन्…

इथे पाहा व्हिडीओ

एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “हे खूप धार्मिक आणि सुंदर आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “हा डान्स व्हिडीओ पाहून मला खूप आनंद झाला”. अन्य एका नेटकऱ्यानं म्हटलं. “हा डान्स खूपच जबरदस्त आहे.” ‘हर हर शंभू’ गाणं लोकांच्या गळ्यातील ताईतच बनलं आहे. कारण अनेकांनी मोबाईलवर या गाण्याची रिंगटोन ठेवलेली पाहायला मिळते आहे. श्रावण महिन्यात गाणं प्रदर्शित झाल्यापासून या गाण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गायिका अभिलिप्सा पांडा यांनी सुरेल आवाजात हे गाणं गायल्याने तमाम चाहत्यावर्गाची मनं जिंकली आहेत. दरम्यान, या गाण्यावर अनेकांनी सुंदर डान्स करुन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याचंही पाहायला मिळत आहे.

Story img Loader