Viral video: शाळा सुरु झाल्या की विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे दडपण येते. शाळेत तास, होमवर्क आणि शिकवणी यामध्ये विद्यार्थ्यांचे बालपण हारवत चालले आहे. परंतु काही शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवणारे शिक्षक असतात. जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील शिक्षकही वेगळी वाट निवडत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आणि शाळेची गोडी निर्माण करतात.त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. कधी शिक्षक विद्यार्थ्यांना तालासुरात कविता शिकवताना दिसतात, तर कधी शिक्षिका मुलांसोबत डान्स करताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात शिक्षक आणि विद्यार्था शाळेच्या मैदानात डान्स करताना दिसत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह शिक्षक असावा तर असा..

व्हिडिओमधील शिक्षक हे स्टेजवर विद्यार्थ्यांच्या समोर नाचत आहेत. नाच रे मोरा गाण्यावर त्यांनी ठेका धरला आहे. त्यांच्या समोर मैदानात विद्यार्थी उभे आहेत. जे वेगवेगळ्या इयत्तेतील दिसत आहेत. या विद्यार्थ्यांनीही शिक्षकांसोबत गाण्यावर ताल धरला आहे. पूर्वीच्या शालेय जीवनात आणि आताच्या शालेय जीवनात खूप जमीन आस्मानाचा फरक आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांसोबत बोलायला देखील घाबरायचे, पण हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांसोबत मजामस्ती करताना दिसतात. शिवाय सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे शाळेतील शिक्षकदेखील विद्यार्थ्यांसोबत रिल्स बनवताना दिसतात. अशाच बुलढाण्यातील जिल्हापरिषद शाळा सवणा येथे हा उपक्रम राबवला आणि विद्यार्थ्यांसोबतच सर्व शिक्षक देखील थिरकले. रोज रोजच्या अभ्यासाने विद्यार्थी देखील कंटाळलेले असतात. या विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमुळे एक ऊर्जा मिळते आणि शाळा हवीहवीशी वाटते.

Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Lalbaugcha raja 2024 darshan mumbai devotees get pushed shoved at lalbaugcha raja amid stampede like situation
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताय? ‘हा’ VIDEO पाहा अन् तुम्हीच सांगा चूक भाविकांची की कार्यकर्त्यांची?
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
anganwadi worker cross the flooded river video goes viral
Video : पूर आलेली नदी ओलांडण्यासाठी अंगणवाडी सेविकेने काय केले?
Viral Video Of Perfect Friendship
VIDEO: तिची-माझी मैत्री! डान्स करताना स्टेप्स विसरली अन्… पाहा चिमुकलीने मैत्रिणीची कशी केली मदत
The little girl dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, चिमुकलीने भररस्त्यात केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

जिल्हा परिषद शाळेत सरांचा जबरदस्त डान्स

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शाळेच्या मैदानावर मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित आहेत. यावेळी सर्व शिक्षक समोरच्या स्टेजवर उभे असून “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” या गाण्यावर डान्स करत आहे. शिक्षकांबरोबरच विद्यार्थीदोखील उत्साहाने डान्स करताना दिसत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्याही डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! भर दिवसा एकटी महिला पाहून त्यानं संधी साधली; धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही VIDEO मध्ये कैद

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @error040290 नावाच्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ‘आई शपथ सांगतो असे शिक्षक माझ्या वेळेसही नव्हते’, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत उपक्रमाचे कौतुक करत आहेत. एकानं म्हंटलंय, खरचं माहोल केला सरांनी, खरोखर सलाम आहे शिक्षकांना आणि त्याच्या समर्पित वृत्ती ला!!अभिमान आहे अशा शिक्षकांचा, माणसाने आयुष्य हे हसत खेळत जगलं पाहीजे ., खरं तर अशाच शिक्षकांची गरज प्रत्येक मुलाला प्रत्येक शाळेला हवी तेव्हा मुलांना प्रत्येक विषयात गोडी निर्माण होईल. अशा अनेक कमेंट केल्या आहेत.