Teacher Dance Video : शाळेचा विषय येताच लगेच बालपणीचे दिवस आठवतात. शाळेचा तो कडक इस्त्री केलेला गणवेश, आपली वर्गखोली, बेंच, फळा, अभ्यास, मित्रांसोबतची ती धमाल आणि शिक्षकांचा कडकपणा. ९० च्या दशकातील मुलांसाठी तरी शाळा म्हणजे हेच होते. मात्र, सध्याची गोष्ट थोडी वेगळी आहे. आता अभ्यासाबरोबरच खेळ, योगासने व नृत्य-संगीत या गोष्टींनाही शाळेत महत्त्व दिले जाते. आधुनिक शाळेतील असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एक मास्तर ढोलकीच्या तालावर चक्क विद्यार्थ्यांसमोर बिनधास्तपणे नाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर लोक म्हणतायत की, असे शिक्षक आमच्या काळात असते, तर फार मजा आली असती.

मास्तर जोमात, विद्यार्थी कोमात (Teacher Dance In Classroom)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वर्गात काही मुलं जमिनीवर बसून ढोलकी वाजविताना दिसत आहेत; तर काही मुलं जवळच उभी आहेत आणि एकत्र पहाडी गाणं गात आहेत. यावेळी विद्यार्थ्यांचं गाणं आणि ढोलकीच्या तालावर भरवर्गात एक मास्तर विद्यार्थ्यांसमोर नाचताना दिसत आहेत. पहाडी गाण्यावर हे मास्तर असा काय ठेका धरतात ही पाहून विद्यार्थीदेखील त्यांना चिअर करतात.

Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Boys dance on nach re mora ambyahya vanat song at school get together function funny video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गेट दुगेदरला शाळेतल्या जुन्या मित्रांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच
Techer Make student cutout
शिक्षिकेच्या कार्याला सलाम! विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर बनवलं तिचं कटआऊट; VIRAL VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
Groom Dancing With His Pet Dog In Viral Video
नवऱ्याची निघाली वरात! वरातीत नाचताना ‘त्याने’ पाळीव श्वानाला उचलून घेतलं अन्… पाहा VIRAL VIDEO
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच

भरवर्गात मास्तरांचा भन्नाट डान्स (teacher dance on pahadi song)

More Trending News : जनावरांवर लेकरांसारखा जीव! पावसात शेळ्यांसाठी मावशीने शिवले रेनकोट्स; पाहा गावाकडील सुंदर Video

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक इन्स्टाग्राम युजर्सना त्यांचे शाळेचे दिवस आठवत आहेत; तर अनेक जण त्यांच्या काळात असे शिक्षक अजिबात नव्हते, असे म्हणत आहेत. कारण- पूर्वी शाळांमध्ये नाच-गाणे हे केवळ शाळेच्या गॅदरिंगपुरते मर्यादित होते. त्यामुळे असे शिक्षण आणि अशी मज्जा त्या काळी करता यायची नाही. त्यामुळे युजर्स या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रकारच्या मजेशीर कमेंट्स करीत आहेत. ( Teacher Dance In Classroom)

“आमच्या काळात असे शिक्षक असते तर?” युजर्सना आठवले शाळेचे दिवस (Teacher Dance To Pahadi Song Goes Viral)

@zindagi.gulzar नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ इन्स्टावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले, “आमच्या शालेय जीवनात असे शिक्षक का नव्हते?” दुसऱ्या युजरने लिहिले, “घरी आई मला मारायची आणि शाळेत शिक्षक मला मारायचे.” तिसऱ्या एका युजरने लिहिले, “आमच्या काळात संगीत व नृत्यासाठी कोणताही तास नव्हता आणि आता संगीत व नृत्यासाठीही वेगळे तास आहेत.” यावर बहुतेकांनी कमेंट केली आहे की, आमच्या काळात असे शिक्षक असते तर? आम्हीही शाळेचा एक वेगळा आनंद लुटला असता.

Story img Loader