Shocking Video: वाईट वेळ कधी येईल हे काही सांगता येत नाही. आजकाल कोणत्या ना कोणत्या कारणाने जागोजागी होणाऱ्या अपघातांच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. या अपघातात अनेकदा चालकांना गंभीर दुखापत होते तर काही जण आपला जीवच गमावून बसतात. अशावेळेस सावधगिरी बाळगून वेळीच योग्य ते पाऊल उचलल्याने संकट टळू शकतं.

गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील होत असतात. सध्या असाच काहीसा प्रकार एका स्कूटरचालकाबरोबर घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका स्कूटरमधून अचानक धूर निघू लागतो. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ या…

Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Shocking Video Udupi Man Tossed In Air
हवा भरताना अचानक फुटला स्कुल बसचा टायर अन् पुढे….;अंगावर शहारा आणणारा Video Viral
car hit student bus Motala , car hit person Death Motala ,
बुलढाणा : बसचे इंजिन तापल्याने पाणी घालायला उतरला आणि इतक्यात…
pune incident of speeding car hitting couple on two wheeler on flyover in Gultekdi
मोटारचालकाची मुजोरी; उड्डाणपुलावर दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक, दाम्पत्याला मदत न करता मोटारचालक पसार
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
Murder of youth Govandi , Argument after hit by car,
मुंबई : गाडीचा धक्का लागला म्हणून खून…

हेही वाचा… VIDEO: मुंबई एसी लोकलमध्ये दोन महिला भिडल्या, लाथा-बुक्क्यांनी मारलं अन् केली शिवीगाळ, पाहा नेमकं काय घडलं

स्कूटरचालकाचा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजात धडकीच भरली. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, इलेक्ट्रिक स्कूटरमधून अचानक धूर निघू लागल्याने रस्त्याच्या मधोमध चालक गाडी थांबवतो. क्षणाचाही विलंब न करता स्कूटरचालक दुचाकीच्या डिक्कीमधून बॅटरी काढतो आणि ती रस्त्यावर फेकून देतो. बॅटरी रस्त्यावर फेकताच त्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागतो आणि दुसऱ्या मिनिटाला बॅटरी जोरात पेट घेते. रस्त्यावर बॅटरीला आग लागल्याचं पाहून आजूबाजूला जमलेली माणसं लांब जातात.

हा धक्कादायक व्हिडीओ @worldofengineering70 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल ७.९ मिलियन व्ह्युज आले आहेत. ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “वेळेवर निर्णय घेणे खूप महत्त्वाचे आहे”, तर दुसऱ्याने “खूप हुशारीने अ‍ॅक्शन घेतली भावाने, गुड जॉब” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “रिमुव्हेबल बॅटरी होती म्हणून त्याचा जीव वाचला.”

हेही वाचा… अरे ही कसली आई? रीलसाठी चिमुकल्याला घेऊन ओढली सिगारेट, महिलेचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर

दरम्यान, याआधीही अशा ई-स्कूटरला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ही आग मुख्यत: बॅटरीमुळेच लागते असं अनेकदा समोर आलंय. या प्रकरणातही असंच घडल्याचं दिसतंय.

Story img Loader