Shocking Video: वाईट वेळ कधी येईल हे काही सांगता येत नाही. आजकाल कोणत्या ना कोणत्या कारणाने जागोजागी होणाऱ्या अपघातांच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. या अपघातात अनेकदा चालकांना गंभीर दुखापत होते तर काही जण आपला जीवच गमावून बसतात. अशावेळेस सावधगिरी बाळगून वेळीच योग्य ते पाऊल उचलल्याने संकट टळू शकतं.
गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील होत असतात. सध्या असाच काहीसा प्रकार एका स्कूटरचालकाबरोबर घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका स्कूटरमधून अचानक धूर निघू लागतो. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ या…
स्कूटरचालकाचा व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजात धडकीच भरली. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, इलेक्ट्रिक स्कूटरमधून अचानक धूर निघू लागल्याने रस्त्याच्या मधोमध चालक गाडी थांबवतो. क्षणाचाही विलंब न करता स्कूटरचालक दुचाकीच्या डिक्कीमधून बॅटरी काढतो आणि ती रस्त्यावर फेकून देतो. बॅटरी रस्त्यावर फेकताच त्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागतो आणि दुसऱ्या मिनिटाला बॅटरी जोरात पेट घेते. रस्त्यावर बॅटरीला आग लागल्याचं पाहून आजूबाजूला जमलेली माणसं लांब जातात.
हा धक्कादायक व्हिडीओ @worldofengineering70 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल ७.९ मिलियन व्ह्युज आले आहेत. ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “वेळेवर निर्णय घेणे खूप महत्त्वाचे आहे”, तर दुसऱ्याने “खूप हुशारीने अॅक्शन घेतली भावाने, गुड जॉब” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “रिमुव्हेबल बॅटरी होती म्हणून त्याचा जीव वाचला.”
दरम्यान, याआधीही अशा ई-स्कूटरला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ही आग मुख्यत: बॅटरीमुळेच लागते असं अनेकदा समोर आलंय. या प्रकरणातही असंच घडल्याचं दिसतंय.