काही लोकं आपल्या टॅलेंट आणि क्रिएटिव्हीटीच्या जोरावर सामान्य गोष्टीही खास बनवतात. अनेक लोक डोकं वापरून अनोखे जुगाड शोधत असतात. कधी जुन्या, तुटलेल्या, मोडलेल्या वस्तूंपासूनही लोक भारी जुगाड करत नवीन वस्तू तयार करतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ खरचं थक्क करणाऱ्या असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल. कारण त्यात पठ्ठ्याने टॉयलेट सीटला असा काही आकार दिला आहे, जो पाहून ही टॉयलेट सीट आहे की स्कूटर असा प्रश्न पडेल.
स्कूटरवाली टॉयलेट सीट!
या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, स्कूटरचे एस्केलेटर फिरवताच टॉयलेटमध्ये पाणी फ्लश होताना दिसत आहे. हा अनोखा जुगाड पाहून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल. व्हिडीओत एक कमोड दिसत आहे, ज्याच्या पुढच्या भागाला स्कूटरचा भाग जोडला आहे. मात्र, हा स्कूटर कमोड घराबाहेर नसून बाथरूमच्या आत आहे. असे अनोखे टॉयलेट तुम्ही याआधी कधीही पाहिले नसेल.
हा व्हिडीओ @hergun1insaat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. यातील अनोखे टॉयलेट पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
एका युजरने लिहिले की, अनोखे टॉयलेट. दुसऱ्या एकाने लिहिले की, ज्या व्यक्तीने हा शोध लावला त्याला २१ तोफांची सलामी दिली पाहिजे. तिसऱ्या युजरने लिहिले की, व्वा, काय शोध आहे.